नमस्कार आमच्या आजचा महाराष्ट्र टॉप टेन मराठी न्यूज चॅनेल मधे आपल स्वागत आहे...येथे तुम्हाला ताज्या घडामोडी व बातम्या मिळतील... बातम्या व जाहिरातींसाठी संपर्क - +91 9029198881 करा. आमचे YouTube चॅनेल, Facebook, Telegram ला सबस्क्राईब/ लाईक करा. , भारतीय दलित साहित्य अकादमीतर्फे गायत्री घुगे या महीला युवा गौरव पुरस्काराने सन्मानित….! – आजचा महाराष्ट्र

भारतीय दलित साहित्य अकादमीतर्फे गायत्री घुगे या महीला युवा गौरव पुरस्काराने सन्मानित….!

मुंबई :- भारतीय दलित साहित्य अकादमीतर्फे स्वर्गीय माधुरी दत्ताराम घुगे स्मृतिप्रित्यर्थ पत्रकारिता क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केल्याबद्दल कु. गायत्री सरला दिनेश घुगे यांचा जेष्ठ संगीतकार अशोक पत्की यांच्या हस्ते पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला आहे. तसेच यावेळी लेखक मंगेश मसुरकर संग्रहित जेष्ठ पत्रकार दत्ताराम घुगे यांच्या चरित्र ग्रंथ बायोस्कोपचे प्रकाशन देखील करण्यात आले.

काल दि.१६ मार्च २०२३ रोजी मुंबईतील दहिसर पुर्व मधील विठ्ठल मंदिरातील स्वामी माधवेंद्र सभागृहात हा पुरस्कार सोहळा पार पडला. प्रमूख पाहुण्यांच्या उपस्थितीमध्ये सकाळी १० वाजता या कार्यक्रमास सुरुवात झाली. दत्ताराम घुगे यांच्या सौभाग्यवती स्व.माधुरी दत्ताराम घुगे यांच्या स्मरणार्थ विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केल्याबद्दल गायत्री घुगे यांच्या सह समाजातील १८ अनेक महिलांचा पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला.

गायत्री घुगे या गेल्या चार वर्षांपासून पत्रकार क्षेत्रात काम करतं आहेत. खूप कमी वयात त्यांनी या क्षेत्रात काम करुन नावलौकिक मिळवला आहे. आपल्या लेखणीने आणि कौशल्याने गायत्री घुगे यांनी पत्रकारिता क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी बजावली आहे. महिलांचे विषय असतील अथवा सामाजिक आपल्या लेखणीतून त्यांनी अगदी प्रखरतेने मांडणी केली आहे. अनेक सेलेब्रिटी व्यक्तींच्या मुलाखती देखील त्यांनी घेतल्या आहेत. त्यांच्या या सर्व कामाची दखल घेऊन त्यांना अनेक ठिकाणी त्यांचा सन्मान देखील केला गेला आहे.

Whatsapp आयकॉन दाबून ही बातमी शेअर करा 

Advertising Space


मुक्त आणि खऱ्या पत्रकारितेसाठी ती कॉर्पोरेट आणि राजकीय नियंत्रणापासून मुक्त असणे आवश्यक आहे. लोक पुढे येऊन सहकार्य करतील तेव्हाच हे शक्य आहे.

आता दान करा

[responsivevoice_button voice="Hindi Female"]