कामोठे येथे संत गाडगेबाबा जयंती उत्सव साजरा !
प्रतिनीधी पनवेल
रायगड (पनवेल) :- संत गाडगे महाराज जयंती” निमित्त रविवार, १२ मार्च २०२३ रोजी खांदेश्वर स्टेशनजवळ “संत गाडगेबाबा विचार मंच प्रतिष्ठान, कामोठे मार्फत एक दिवसीय उत्सव साजरा करण्यात आला.

या जयंती उत्सवाच्या निमित्ताने संत गाडगेबाबांच्या विचारसरनीशी अनुसरुन विवीध समाजोपयोगी उपक्रम आयोजित केले होते.दिवसाची सुरुवात “स्वच्छता दिंडी व प्रभातफेरिने” करण्यात आली. यात १०० च्या वर नागरिकानी सहभाग घेतला आणि रस्त्यांची सफाई करण्यात आली.याबरोबरच संध्याकाळी प्रसिद्ध किर्तनकार श्यामजी वानखेडे यांचे किर्तन, पनवेल महानगरपालिक सफाई कर्मचाऱ्यांचा सत्कार आणि “स्वच्छ-सु्दर सोसायटी स्पर्धेचे” पारितोषिक वितरण करण्यात आले.आयोजकानी कामोठेयातिल नागरिकांसाठी भंडार्याचे आयोजन केले होते.या उत्सवाचे प्रमुख पाहुणे, मार्गदर्शक आणि आकर्षण संत श्री. दिलिपबाबा हे होते. कार्यक्रमाला विवीध संघटनाचे पदाधिकारी तसेच स्थानिक नेतेमंडळी यांनी हजेरी लावली.या जयंती उत्सवासाठी प्रतिष्ठानामार्फत अनिल मेश्राम, प्रभाकर अडेकर, विवेकानंद पाटिल आणि संपुर्ण टिमने मेहनत घेतली.याचबरोबर कामोठे कॅालनी फोरम संघटनेच्या डॅा. सखाराम गारळे, राहुलदादा आग्रे, राहुल बुधे, निलेश आहेर, जयवंत खरात, अनिल पवार आणि तुषार दळवी यांचे विशेष सहकार्य लाभले.
|
Whatsapp आयकॉन दाबून ही बातमी शेअर करा |
Advertising Space













