चिंचवली वाडी येथे श्री छत्रपती शिवाजी महाराज यांचा जयंती सोहळा मोठ्या उस्थाही वातावरनातं संपन्न झाला
प्रतिनीधी पांडुरंग रामचंद्र माने
रायगड (माणगाव) :- श्री छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंती निमित्त चिंचवली वाडीच्या शिवभक्त यांच्या कडून किल्ले रायगड ते चिंचवली वाडी गोरेगाव शिवज्योतिचे आगमनाचा सोहळा आयोजित 
केला होता. गावातील तरुण शिवभक्त, शिवज्योत आणण्यासाठी किल्ले रायगड वर गेले तेथून प्रत्येक तरुण” एक धाव माझ्या राजा साठी “हे उद्धीष्ठ मनाशी बाळगून शिवज्योत घेऊन धावले त्यानंतर संध्याकाळी श्री छत्रपती शिवाजी महाराज यांच्या मूर्तीचे पालखीतून 
संपूर्ण गावात भव्यदिव्य मिरवणुक ढोलताशांच्या च्या गजरात काढली जेष्ठ मंडळी, महिला, लहान मुलं, मुली, तरुण मुले यांनी लेझिम नृत्ये करत महाराजांचा जय घोष करत मिरवणुकीत रंगत वाढवली. ह्यावेळी संपूर्ण गाव भगवे मय झाले होते. महाराजांच्या जयंती निमित्त सगळीकडे आनंदी आणि उत्साही वातावरण होते.
|
Whatsapp आयकॉन दाबून ही बातमी शेअर करा |
Advertising Space













