रोहा तालुक्यात सानेगाव जंगलपट्टयात होतेय अवैध वृक्ष तोड? पुन्हा सुरू झाली लाकडाची कत्तल
प्रतिनीधी जयप्रकाश पवार
रायगड (रोहा) :- वनविभाग खात्याच्या अजब कारभारामुळे वनविभागाचे कर्मचारी लाकूड व्यापा-यांना हाताशी धरुन अवैध वृधतोड करत आहेत वनविभाग स्वता : या गैरप्रकाराकडे दुर्लक्ष करीत आहे,
वृक्षतोड होत असणा-या सानेगाव परिसरातील नागरिकांना प्रचंड मानसिक त्रासाला सामोरे जावे लागत आहे. सरकार आणि नोकरशाही त्याच्या निष्क्रीय आणि ढिसाळ कारभारामुळे सामान्य जनतेला रोज नव्या समस्याना सामोरे जावे लागत आहे समस्या सोडवून घेण्यासाठी म्हणून शासन दरबारी जायचे आणि दरबारातून परतायचे असा अनुभव नागरिकाना आला आहे,

सानेगाव जंगलपट्टयात मोठया प्रमाणात वृक्षतोड सुरू असून तसेच ऐन ,किजळ,साग ,आणि इतर जातीची झाडे आहेत या काही झाडांचा विट भट्टीसाठी लाकडाचा वापर केला जातो. मोठी मागणी असते परिणामी साहजिकच मोठी किमत मिळते तसेच व्यापारी आणि वन विभागाचे अधिकारी यांच्यात साटेलोटे निर्माण झाल्याचे पाहायला मिळते त्यामुळे सानेगाव परिसरामध्ये २५/२चा मनाई आदेश असताना अवैधपणे तोड सुरू आहे वनपाल व वनरक्षक तसेच तालुका वनक्षेत्रपाळ लाकूड व्यापा-याजवळ बेकायदेशीर संगनमत करून वृक्षाची तोड करत आहे, याची मुख्यवन संरक्षक याच्या कडुन चौकशी करून
याना ताक्तळ निलंबित करावे अशी मागणी परिसरात जोर धरत आहे,
|
Whatsapp आयकॉन दाबून ही बातमी शेअर करा |
Advertising Space













