रोहा पोलिसांची दमदार कामगिरी- तब्बल १८०० लिटर गावठी दारू केली नष्ट…

हे अड्डे नक्की आहेत तरी कोणाचे?- रोहा पोलिसांचा बारकाईने शोध…
रायगड (रोहा) :- गेल्या काही दिवसांपासून रोहा तालुक्यामध्ये गावठी दारूची आयात वाढलेली दिसून येते . ही दारू इतकी घातक होती. की गेल्या काही महिन्यांमध्ये ही दारू पिऊन काही लोकांचा 
बळी सुद्धा गेलेला पाहायला मिळाला. परंतु ही दारू कुठून येत होती याचा छडा काही लागत नव्हता रोहा पोलिसांनी याकडे बारकाईने लक्ष देत. रोहा तालुक्यातील दीव, कोपरी,न्हावे येथील गावठी 
दारूच्या हातभट्टीच्या अड्ड्यांचा शोध घेत. तेथे आज सकाळच्या सुमारास प्रोविजन रेड केली. आणि तेथून तब्बल १८०० लिटर सुमारे ३५००० रुपया ची गावठी दारू जप्त करत. त्या दारूचा जागीच 
नायनाट करण्यात आला. आणि ते बेवारीस अड्डे संपूर्णतः नष्ट करण्यात आले. ही धडक कारवाई रोहा पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक प्रमोद बाबर साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली पो.स.ई. काजरोळकर, पो.हवा गदमले, पो.ना. पाटील यांनी केली. पुढील तपास रोहा पोलीस करत आहे…
|
Whatsapp आयकॉन दाबून ही बातमी शेअर करा |
Advertising Space













