मराठी साहित्य व कला मंडळ , कामोठे च्या वतीने मराठी राजभाषा दिवस उत्साहात साजरा

रायगड (पनवेल):- मराठी साहित्य व कला मंडळ कामोठे च्या वतीने मराठी राजभाषा दिना निमीत्त मराठी भाषा संवर्धन ह्या विषयवार चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले होते. २७ फेब्रुवारी हा कवी कुसुमाग्रज ह्यांचा जन्मदिवस मराठी राजभाषा दिवस म्हणून साजरा करण्यात आला. संत ज्ञानेश्वर महाराज अणि कवी कुसुमाग्रज ह्यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करत अभिवादन करून कार्यक्रमाला सुरवात झाली. कामोठे शहरामधे मराठी साहित्य व कला क्षेत्रातील 
उपक्रम राबविणे तसेच मराठी भाषेच्या संवर्धनासाठी वाचनमाला, व्याख्यानमाला, ग्रंथालय ह्या सारखे उपक्रम राबविण्याच्या ऊद्देशाने मंडळाची स्थापना केल्याची माहिती मंगेश अढाव ह्यांनी प्रस्तावने दरम्यान मांडली. शिक्षक विजय सुर्यवंशी ह्यांनी कवी कुसुमाग्रज अणि संत ज्ञानेश्वर माऊली ह्यांच्या कार्याची माहिती देत मराठी राजभाषा दिनची महती विषद केली.मराठी साहित्य क्षेत्रातील विविध संत, कवी , लेखक ह्यांच्या कार्यांचा गौरव करत त्यांच्या कार्याबद्दल आभार मानत रंजना सडोलीकर ह्यांनी मनोगत व्यक्त केले.
त्यानंतर कार्यक्रमाच्या प्रमूख पाहुण्या सौ. सुनेत्रा वाघ मैडम ह्यांनी मराठी भाषा अणि भाषेचे संवर्धन ह्याविषयी उपस्थितांना महत्त्वपुर्ण मार्गदर्शन केले. तसेच मराठी भाषेच्या संवर्धनासाठी काय प्रयत्न केले पहिजेत ह्याबाबत चर्चासत्रादरम्यान उपस्थितांनी आपली महत्वपुर्ण मते मांडली. कार्यक्रमादरम्यान बाळगोपाळांपैकी सार्थक आपटे अणि श्लोक आपटे ह्यांनी मराठी कविता सादर उपस्थितांची मने जिंकली . तसेच जयश्री झा अणि संजीवनी तोत्रे ह्यांनी ओवी गाऊन तर श्वेता भुसारी ह्यांनी कविता सादर करून कार्यक्रमाची शोभा वाढवली. मराठी राजभाषा दिन कार्यक्रमास जेष्ठ नागरीक, महिला, लहान मुले, युवा वर्ग तसेच विविध सामजिक संघटनांचे प्रतिनिधी आवर्जुन उपस्थित होता. कार्यक्रमाची सांगता सामुहिक पसायदानाने करण्यात आली.
|
Whatsapp आयकॉन दाबून ही बातमी शेअर करा |
Advertising Space













