के व्ही कन्या शाळेच्या १९६६-६७ च्या SSC batch विद्यार्थिनी चे स्नेह मिलन जैन हॉल पनवेल येथे सम्पन्न झाले .
प्रतिनीधी पनवेल
रायगड (पनवेल) :- के व्ही. कन्या शाळेच्या ssc बॅच च्या विद्यार्थिनींचे स्नेह मिलन कार्यक्रम जैन हॉल पनवेल येथे साजरा झाला. या कार्यक्रमात सत्तरी पार केलेल्या सुमारे ४० जणींनी सहभाग घेतला . अमेरिकेत स्थायीक असलेल्या उज्ज्वला शेठ तसेच बैंगलोर, नाशिक, पुणे , ठाणे , डोंबिवली आदि विविध शहरांतून आलेल्यानी ७०/७५ नव्हे तर १७ वर्ष वयाच्या उत्साहाने सहभाग घेतला . सर्वांनी शाळेला भेट देऊन जून्या आठवणींना ऊजाळा दिला .
सर्व शिक्षक वृंदाने यथोचित स्वागत केले . शकुंतला बांठीया , सुमन नातू, शकुंतला दिवटे, कुन्दा कुळकर्णी , सुलोचना घांग्रेकर, उज्ज्वला शेठ , पाटकर मैडम , अंजली भगत , प्रेमा सोहोनी , निर्मला मुनोथ, शैला गड़करी आणि अनेक जणिंनी आपले मनोगत व्यक्त केले . बालकलाकार वृद्धी बांठीया हिने गाणी सादर करुन सर्वांची मने जिंकली . सर्वांना एकत्र आणुन हा कार्यक्रम सफल आणि अविस्मरणीय करण्यासाठी शकुंतला बांठीया ने ( मेहता, बंगलोर ) अथक मेहनत घेतली . शालेय मैत्रीला वयाचे बंधन नसते याचे मूर्तिमंत उदाहरण असा हा स्नेह मिलनाचा सोहळा !
सकाळी ९ वाजता सुरू झालेला कार्यक्रम संध्याकाळी ६ वाजता संपला . जड़ अंत:कर्णाने सर्वानी निरोप घेतला .
|
Whatsapp आयकॉन दाबून ही बातमी शेअर करा |
Advertising Space













