नमस्कार आमच्या आजचा महाराष्ट्र टॉप टेन मराठी न्यूज चॅनेल मधे आपल स्वागत आहे...येथे तुम्हाला ताज्या घडामोडी व बातम्या मिळतील... बातम्या व जाहिरातींसाठी संपर्क - +91 9029198881 करा. आमचे YouTube चॅनेल, Facebook, Telegram ला सबस्क्राईब/ लाईक करा. , तिल्लोरी-कुणबी समाजाचे दाखले पूर्ववत देण्यात येणार जिल्हाधिकारी रत्नागिरी – आजचा महाराष्ट्र

तिल्लोरी-कुणबी समाजाचे दाखले पूर्ववत देण्यात येणार जिल्हाधिकारी रत्नागिरी

प्रतिनीधी रत्नागिरी

रत्नागिरी :- महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामार्फत छत्रपती शाहू महाराज संशोधन प्रशिक्षण व मानव विकास संस्था (सारथी) पुणे यांनी दिनांक- २ फेब्रुवारी २०२३ रोजी राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटक विद्यार्थी शिष्यवृत्ती योजना (NMMS) या योजनेमध्ये मराठा, कुणबी, कुणबी-मराठा, मराठा-कुणबी या लक्षित गटातील विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्ती बाबत सर्व माध्यमिक शिक्षण अधिकारी यांच्याकडून सर्व मुख्याध्यापकांमार्फत इयत्ता आठवीच्या विद्यार्थ्यांची विहित नमुन्यात माहिती मागविण्यात आली होती. त्या माहितीतून रत्नागिरी, रायगड, सिंधुदुर्ग जिल्ह्यातील तिल्लोरी- कुणबी, ती- कुणबी यांची नोंद शाळेच्या रजिस्टर वर असलेल्या अनेक विद्यार्थ्यांना वगळण्यात आले पर्यायाने अशा विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती मिळणार नाही हा अन्याय सारथी संस्था पुणे यांनी केला आहे. म्हणून त्या संबंधीचा पत्रव्यवहार तात्कालीन बहुजन कल्याण मंत्री विजय वडेट्टीवार तसेच सारथी व मागासवर्ग आयोग पुणे यांच्याकडे करण्यात आला होता. परंतु राज्य सरकार मधील मंत्री महोदय गटाने कोणतीही कार्यवाही केली नाही मात्र मागासवर्ग आयोग पुणे यातील काही सदस्यांनी त्याची चौकशी रत्नागिरी, अलिबाग या ठिकाणी केली. उपस्थित ग्रामस्थ कार्यकर्त्यांकडून विषयाचे गांभीर्य लक्षात घेऊन मुदतवाढ मागितली परंतु प्रशासनातील अनभिन्न अधिकारी वर्गाकडूनच तिल्लोरी-कुणबी बांधवांचे दाखले बंद करण्याचे अन्यायकारक निर्णय घेऊन तिलोरी-कुणबी व ती कुणबी समाज बांधवांच्या अडचणी निर्माण केल्या आहेत. याबाबत दिनांक ६ फेब्रुवारी २०२३ रोजी माननीय नामदार मुख्यमंत्री यांच्या वर्षा निवासस्थानी माननीय पालकमंत्री तसेच वरिष्ठ पातळीवरील सचिव व *कुणबी समाज उन्नती संघ मुंबईचे अध्यक्ष मा.श्री. भूषणजी बरे साहेब , राजकीय संघटन समिती तिचे अध्यक्ष मा.श्री. अशोकजी वालम साहेब, कुणबी युवा आघाडी, कुणबी महिला आघाडी यांच्या पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत* सभा पार पडली व तिल्लोरी-कुणबी समाजातील सर्वांना इतर मागास वर्गाचे दाखले पूर्ववत देण्यात यावेत अशा सूचना देण्यात आल्या. व जिल्हाधिकारी रत्नागिरी यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिनांक 9 फेब्रुवारी २०२३ रोजी बोलवून या सूचनांची अंमलबजावणी करण्याचे सांगितले मात्र उपविभागीय अधिकारी आणि जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समितीचे अधिकाऱ्यांनी या सूचनांची अंमलबजावणी न करताच सेतू कार्यालयात तसेच जात पडताळणी कार्यालयात अर्ज स्वीकारणे बंद केले. याबाबत आज दिनांक २७ फेब्रुवारी २०२३ रोजी कुणबी राजकीय संघटन समितीचे सरचिटणीस मा.श्री. नंदकुमारजी मोहिते साहेब यांच्या समवेत माननीय जिल्हाधिकारी रत्नागिरी यांची शिष्टमंडळाने भेट घेऊन लेखी म्हणणे व शासन निर्णयाच्या छायांकित प्रति सादर केल्या व चर्चेदरम्यान मी या सूचना यापूर्वीच दिल्या आहेत दिंडोरी कडून मी समाजाचे दाखले संबंधित अधिकार्‍याकडून दिले जातील कसलीही अडवणूक होणार नाही उद्या म्हणजेच २८ फेब्रुवारी २०२३ रोजी सकाळी ११ वाजता संबंधित अधिकाऱ्यांच्या कॉन्फरन्स मीटिंगमध्ये पुन्हा सूचना देतो असे आश्वासन जिल्हाधिकारी साहेब यांच्यामार्फत देण्यात आले. या शिष्ट मंडळात मा. सुरेश भायजे, मा. रामचंद्र गराटे, मा. बी.टी. कांबळे, मा. सनगरे, मा. नंदकुमार आंबेकर, मा. आबा बंडबे मा. सौ. स्नेहा चव्हाण, मा. संतोष आंबेकर, मा. दत्ता लांबे* इत्यादी कार्यकर्ते उपस्थित होते.

Whatsapp आयकॉन दाबून ही बातमी शेअर करा 

Advertising Space


मुक्त आणि खऱ्या पत्रकारितेसाठी ती कॉर्पोरेट आणि राजकीय नियंत्रणापासून मुक्त असणे आवश्यक आहे. लोक पुढे येऊन सहकार्य करतील तेव्हाच हे शक्य आहे.

आता दान करा

[responsivevoice_button voice="Hindi Female"]