राज ठाकरे यांची मराठी भाषा दिनानिमित्त मोकळी-ढाकळी मुलाखत
प्रतिनीधी पनवेल
रायगड (पनवेल) :-भाषण करुन आल्यावर काय बोललो, यापेक्षा काय दिलं हे बाळासाहेब ठाकरे यांनी शिकवल्याचे वक्तव्य महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे यांनी केलं. मी प्रेमाची पुस्तक वाचत नाही. तो प्रेम करतोय मी कशाला वाचायचं असे ठाकरे म्हणाले. मला ठराविक लोकांची चरित्र वाचायला आवडतात असेही 
राज ठाकरे म्हणाले. जगात भाषेने तुम्ही ओळखले जाता. त्यामुळे भाषा हीच तुमची ओळख असल्याचे राज ठाकरे म्हणाले. मराठी भाषा गौरव दिनानिमित्त पनवेलमध्ये राज ठाकरेंच्या मुलाखतीचं आयोजन करण्यात आलं होतं. त्यावेळी ते बोलत होते.
|
Whatsapp आयकॉन दाबून ही बातमी शेअर करा |
Advertising Space













