जगद्गुरु नरेंद्र महाराज संस्थान स्व-स्वरूप संप्रदाय खेड सेवाकेंद्र बिजघर ‘तिसंगी ‘कुळवंडी यांचे वतीने महा संतसंग सोहळा, नामगजर आणी प्रवचन सोहळा संपन्न

रत्नागिरी (खेड) :- अनंत श्री विभुषित जगद्गुरू रामानंदाचार्य श्री स्वामी नरेंद्राचार्यजी महाराज तसेच पिठाचे उत्तराधिकारी प.पू.कानीफनाथ महाराज यांचे कृपाशिर्वादाने हनुमान मंदीर तिसंगी
(निकमवाडी) खेड रत्नागिरी येथे जगद्गुरू श्रींचा ऑनलाईन महासंतसंग सोहळा,” गणी गण गणात बोते ” या सिद्ध मंत्राचा नाम गजर सोहळा आणि ज.न.म. संस्थान प्रवचनकार श्रीमती ज्योती ताई पाटील यांचे सुश्राव्य प्रबोधन याचे आयोजन करणेत आले होते . आध्यत्म विज्ञान आणि व्यवहार या तिन्ही गोष्ठींची सांगड घालून जिवनामध्ये कसे जगावे यावर अध्यात्मिक प्रबोधन झाले तसेच
” विज्ञानाने केली क्रांती,अध्यात्माशिवाय नाही मन शांती “
रोजचे नामस्मरण का करावे? आठवड्याचा संतसंग का करावा?
समाजाच्या ऋणातून मुक्त होण्यासाठी सामाजिक सेवा आणि आध्यात्मिक सेवा कशा करायच्या यावर मौलिक प्रबोधन प्रवचनकार पाटिल ताई यांनी केले .प्रवचनकार यांचे स्वागत तिसंगी गावचे सरपंच सौ मनिषा काजारेताई आणि उपसरपंच स्नेहल नंदकिशोर भोसले, यांनी केले कार्यक्रम प्रसंगी बिजघर गावचे अण्णा विचारे (माजी तंटामुक्ती अध्यक्ष ) तिसंगी गावचे पोलिस पाटील श्री संतोष मोहिते आणि ग्रा.प .सदस्य श्री बबलूशेठ भिकाजी भोसले , संजय 
निकम जिल्हा युवाध्यक्ष श्री सौरभ चाळके साहेब ता. महिलाध्यक्षा सौ. मनस्वी भरणे ता . आध्या . प्रमुख श्री . सुनिल गुरव साहेब ता . प्रसिद्धी प्रमुख श्री विजय भोसले साहेब रसिका यादव ताई महादेव भोसले साहेब सुनिल लाड साहेब सेवाकेंद्र अध्यक्ष श्री खापरे साहेब 
सेवाकेंद्र महिलाध्यक्ष सौ ओवळकर ताई ‘ श्रीमती भरणे ताई युवा प्रमुख महेंद्र भरणे प्रेम ओवळकर इ . मान्यवर उपस्थित होते पंचक्रोशीतील सेवाकेंद्र बिजघर तिसंगी कुळवंडी ऐनवली लोटे पन्हाळजे आंबये कळबणी सवणस येथील भविक भक्तगण व ग्रामस्थ मोठ्या संखेने उपस्थित होते . कार्यक्रमाचे सुत्रसंचालन ता . माजी मेजर श्री भाऊराव भोसले यांनी केली . शेवटी भजन सेवा करून उपस्थितांचे आभार मानून जगद्गुरु नरेंद्राचार्यजी महाराज यांच्या नामगजराने कार्यक्रमाची सांगता करणेत आली
*तुम्ही जगा, दुसर्याला जगवा.*
|
Whatsapp आयकॉन दाबून ही बातमी शेअर करा |
Advertising Space













