माय भूमि फाऊंडेशनच्या वतीने शिरोडकर हाय – स्कूल परळ येथे महा रक्तदान शिबीर आयोजित करण्यात आले

रत्नागिरी (खेड) :- दि. २६फेब्रुवारी २०२३ रोजी डॉ. शिरोडकर हायस्कूल परळ या ठिकाणी माय भूमी फाउंडेशन च्या वतीने संस्थापक अध्यक्ष श्री अनंत कापसाहेब यांच्या अध्यक्षतेखाली फाउंडेशनचे सर्व पदाधिकारी यांनी महा रक्तदान शिबिराचे आयोजन 
केले होते .प्रमुख अतिथी सर. जे जे रुग्णालयाचे अधीक्षक मा. डॉ.संजय सुरासेसर, मंडणगड तालुक्याचे माजी सभापती श्री. दौलतराव पोस्टूरे, उद्योजक श्री मनोज शेठ घागरुम, उद्योजक श्री महेंद्र टिंगरे साहेब, डॉ. चेतन भगत सर, पोलीस उपनिरीक्षक श्री सुभाष पोस्टुरे साहेब,, श्री चंद्रकांत करंबेलेसाहेब हायकोर्ट स जे जे रुग्णालयाचे कामगार संघटनेचे अध्यक्ष श्री काशिनाथ राणे, सचिव श्री महेश चव्हाण श्री चेतन मोरे साहेब माणगाव, श्री सुधीर कदम साहेब दापोली ही दहशत डांगरे साहेब, पुष्पा बेर्डे मॅडम शताब्दी हॉस्पिटल श्री प्रदीप मोगरे साहेब के एम हॉस्पिटल श्री नितीन चाळके
रोगणसेवक शिवशंकर बांदरे साहेब विश्वास शिंदे साहेब तुकाराम गायकवाड साहेब सुनील माळी साहेब तुकाराम गायकवाड विश्वनाथ रक्ते साहेब सुनील माळी, ,जल फाऊंडेशन श्री.नितिन जाधव,श्री.सचिन म्हादळेकर इतर अनेक मान्यवरांच्या उपस्थितीत मायभूमी फाउंडेशन उद्घाटन सोहळा आणि भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले त्यामध्ये कोकणातील खेड, दापोली, मंडणगड, माणगाव, श्रीवर्धन या तालुक्यातील रक्तदात्याची मोठ्या प्रमाणात उपस्थिती होती. कोकणातून येणाऱ्या रुग्णास रक्ताचा तुटवडा भासू नये. त्यांना उपचाराच्या वेळी कोणतीही अडचण भासू नये म्हणून माय भूमी फाउंडेशन चे संस्थापक/ अध्यक्ष श्री अनंत काम यांनी फाउंडेशन ची स्थापना करून. एक रुग्णसेवेचा वसा घेतला. आज माय भूमी फाउंडेशन ची स्थापना करून महारक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आलं त्यामध्ये २८० रक्तदात्यांनी रक्तदान केलं. आणि शासकीय रुग्णालयामध्ये ते विनामूल्य देण्यात आले त्यामध्ये सर जेजे रुग्णालय, सायन रुग्णालय, के एम रुग्णालय या तीन रुग्णालयाच्या रक्तपेढीना आमंत्रित करून त्या ठिकाणी विनामूल्य रक्त पुरवठा करण्यात आला. कार्यक्रम यशस्वी करण्याकरिता माय भूमी फाउंडेशनचे संचालक मंडळ मा. श्री महादेव धामणे, (कार्याध्यक्ष) श्री.अनंत कोबनाक सचिव , श्री रघुनाथ पोस्टुरे (उपाध्यक्ष), श्रीसत्यजित भोनकर, (सहसचिव) , श्री.कृष्णा रावजी चाचले (कोषाध्यक्ष) श्री विठ्ठल शिगवण सहखजिनदार श्री दीपेश हेलगावकर (वैद्यकीय सदस्य) श्री संजय पातेरे (क्रीडा सदस्य )श्री प्रदीप मोगरे (सल्लागार) श्री नितीन चाळके (सल्लागार) इतर अनेक फाउंडेशनच्या सहकाऱ्यांचं कार्यक्रम यशस्वी करण्यामागे सिंहाचा वाटा होता त्या सर्व शिलेदारांचं, रक्तदात्यांचे माय भूमी फाउंडेशनचे संस्थापक/ अध्यक्ष श्री अनंत काप साहेब यांनी आभार मानले.
|
Whatsapp आयकॉन दाबून ही बातमी शेअर करा |
Advertising Space













