नमस्कार आमच्या आजचा महाराष्ट्र टॉप टेन मराठी न्यूज चॅनेल मधे आपल स्वागत आहे...येथे तुम्हाला ताज्या घडामोडी व बातम्या मिळतील... बातम्या व जाहिरातींसाठी संपर्क - +91 9029198881 करा. आमचे YouTube चॅनेल, Facebook, Telegram ला सबस्क्राईब/ लाईक करा. , राजापूर येथील पत्रकार हत्या घटनेतील दोषींवर कठोर कारवाई करा – आजचा महाराष्ट्र

राजापूर येथील पत्रकार हत्या घटनेतील दोषींवर कठोर कारवाई करा

पत्रकार श्रीकृष्ण शेळके

भोकरदन/जाफ्राबाद तालुक्यातील अवैध धंदे बंद करण्याची मागणी

ऑल इंडीयन पत्रकार असोशिएयन संघटनेचे उपविभागीय अधिकारी मार्फत गृहमंत्री यांना निवेदन

जालना (भोकरदन) :- ऑल इंडीयन पत्रकार असोशिएयन संघटनेच्या वतीने जालना जिल्हा भोकरदन तालुका उपविभागीय अधिकारी अतुल चोरमारे यांना निवेदन देण्यात आले. दिलेल्या निवेदनाद्वारे मागणी करण्यात आली की,

रत्नागिरी जिल्हयातील मौजे राजापुर येथील निर्भीड,ठळक व घटनेवर आधारीत वृत्तपत्रामध्ये बातमी छापणारे पत्रकार शशिकांत वारिशे यांनी रत्नागिरी जिल्हयामध्ये चालु असलेल्या अवैध धंद्याबाबत वृत्त छापुन प्रसिध्दी दिल्यामुळे तेथील अवैध धंदे करणा – या माफीयांनी हेतुपुरस्कर , जाणुनबुजुन त्यांच्या हत्येचा कट रचुन त्यांचा अपघात घडवुन त्यांची हत्त्या केल्यामुळे संबंधीत घटना घडवून आणणा – यावर कठोर कार्यवाही करण्यात यावी व हत्या झालेल्या कुटुंबीयांना ५० लाख रुपयांची तातडीची मदत देण्यात यावी.व राज्यात पत्रकार संरक्षण कायद्याची अंमलबजावणी करण्यात यावी अशी मागणी करण्यात आली.तसेच जालना जिल्हयातील भोकरदन – जाफ्राबाद तालुक्यामध्ये सध्या सुरु असलेले अवैध धंदे वाळू,मुरुम अवैध उपसा व वाहतूक,वृक्ष तोड,जुगार,पत्ता,वरली – मटका,अवैध देशी विदेशी दारू,गुटखा विक्री,राशनची काळ्या बाजारात होणारी विक्री यासारखे अन्य अवैध धंदे मोठया प्रमाणात तालुक्यात कोणाच्या आशीर्वादाने सुरू असुन अशा वृत्ताची दखल घेवून भोकरदन / जाफ्राबाद तालुक्यातील ऑल इंडीया पत्रकार असोशियशन संघटनेचे तालुकाध्यक्ष मिर्झा जुल्फे कार बेग उपाध्यक्ष शेख नासेर

. महासचिव शेख संमद महाराष्ट्र सचिव इस्रार पठाण शेख अन्सर रईस पठाण .त्रकारांनी याची बातमी प्रकाशित केल्यास त्यांच्याही जिवीतास धोका निर्माण होण्याची भिती निर्माण झाली आहे.याकरीता अश्या अवैध धंदे करणाऱ्या व्यक्तींची चौकशी करून त्यांच्यावर कठोर कार्यवाही करण्यात यावी व तसेच भोकरदन जाफ्राबाद तालुक्यात होणाऱ्या वरील प्रमाणे बेकायदेशिर अवैध धंद्यांना आळा घालण्यात यावा.अशी मागणी उपविभागीय अधिकारी अतुल चोरमारे यांच्या मार्फत गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना निवेदन देऊन करण्यात आली आहे.

*चौकट*

*भोकरदन जाफ्राबाद तालुक्यांतील अवैध धंदे बंद करण्याची मागणी*

भोकरदन – जाफ्राबाद तालुक्यामध्ये सध्या सुरु असलेले अवैध धंदे वाळू,मुरुम,वृक्ष तोड,जुगार,वरली – मटका,जागोजागी पत्त्याचे क्लब,अवैध देशी विदेशी दारू,गुटखा विक्री,राशनची काळ्याबाजारात होणारी विक्री यासारखे अन्य अवैध धंदे मोठया प्रमाणात तालुक्यात कोणाच्या आशीर्वादाने सुरू असुन याची चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी संघटनेच्या वतीने करण्यात आली आहे.

Whatsapp आयकॉन दाबून ही बातमी शेअर करा 

Advertising Space


मुक्त आणि खऱ्या पत्रकारितेसाठी ती कॉर्पोरेट आणि राजकीय नियंत्रणापासून मुक्त असणे आवश्यक आहे. लोक पुढे येऊन सहकार्य करतील तेव्हाच हे शक्य आहे.

आता दान करा

[responsivevoice_button voice="Hindi Female"]