नमस्कार आमच्या आजचा महाराष्ट्र टॉप टेन मराठी न्यूज चॅनेल मधे आपल स्वागत आहे...येथे तुम्हाला ताज्या घडामोडी व बातम्या मिळतील... बातम्या व जाहिरातींसाठी संपर्क - +91 9029198881 करा. आमचे YouTube चॅनेल, Facebook, Telegram ला सबस्क्राईब/ लाईक करा. , ग्रँड वैद्यकीय महाविद्यालय ज. जी. रुग्णालय येथे पल्लवी सापळे मॅडम यांच्या हस्ते सन्मान – आजचा महाराष्ट्र

ग्रँड वैद्यकीय महाविद्यालय ज. जी. रुग्णालय येथे पल्लवी सापळे मॅडम यांच्या हस्ते सन्मान

पत्रकार राजेंद्र दळवी

रत्नागिरी (खेड) :- दिनांक २४/०२/२०२३ रोजी चतुर्थ श्रेणी कर्मचारी संघटनेच्या वतीने रुग्णालयाचे अधिष्ठाता सन्माननीय डॉक्टर पल्लवी सापळे मॅडम सहयोगी अधिष्ठाता डॉक्टर गजानन चव्हाणसर, वैद्यकीय अधिकारी डॉक्टर अरुण राठोडसर, डॉक्टर रेवंत सर अधिसेविका श्रीमती योजना मॅडम, प्रशासकीय अधीक्षक श्री.दीपक

लाड, श्री विजय अंधारे, श्रीमती पोशिंदे मॅडम अनिल दळवी संघटनेचे अध्यक्ष श्री काशिनाथ राणे सचिव श्री यशवंत दळवी ,श्री.महेश चव्हाण ,श्री.संदीप येरुणकर,संजय हंजणकर,किशोर शेलार ,अविनाश मोरे,सखाराम धुरी,श्रीमती शारदा येवले,दायाबेन परमार,व

संघटनेचे सर्व पदाधिकारी तसेच रुग्णालयातील सर्व संघटना कृती समिती, तृतीय श्रेणी कर्मचारी संघटना महाराष्ट्र राज्य परिचारिका संघटना रुग्णालयातील सर्व संघटनेचे पदाधिकारी यांच्या उपस्थितीत कर्मचाऱ्यांना रुग्णालयाच्या अधिष्ठाता डॉक्टर पल्लवी सापळे मॅडम व इतर मान्यवरांच्या हस्ते सन्मानपत्र देऊन गौरविण्यात आले..

कोविड काळात आपल्या जीवाची परवा न करता रुग्ण सेवा केलेल्या कर्मचाऱ्यांचे गौरव करण्यात आले. त्यामध्ये अतिदक्षता विभाग, आपघात विभाग, कक्ष क्रमांक ४ कक्ष क्रमांक ६ कक्ष क्रमांक १२ कक्ष क्रमांक ३२कक्ष क्रमांक ४० कक्ष क्रमांक ४३ कोविड लॅब स्क्रीन विभाग अशा विभागामध्ये उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या विभागातील सर्व कर्मचारी स्टाफ नर्सेस यांना सन्मान चिन्ह देऊन गौरवण्यात आले. Covid – १९ प्रादुर्भाव वेळी कर्मचाऱ्यांनी केलेल्या कामाचा कौतुक मा. रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉक्टर पल्लवी सापळे मॅडम यांनी केले. रुग्णालयामध्ये १८० कर्मचाऱ्यांना सन्मानपत्र देऊन गौरवण्यात आले.संपूर्ण कार्यक्रमाचे सुत्रंसचालण संघटनेचे सचिव श्री .महेश चव्हाण यांनी केले.

Whatsapp आयकॉन दाबून ही बातमी शेअर करा 

Advertising Space


मुक्त आणि खऱ्या पत्रकारितेसाठी ती कॉर्पोरेट आणि राजकीय नियंत्रणापासून मुक्त असणे आवश्यक आहे. लोक पुढे येऊन सहकार्य करतील तेव्हाच हे शक्य आहे.

आता दान करा

[responsivevoice_button voice="Hindi Female"]