गजानन महाराज मंदिर कशेडी ता खेड जिल्हा रत्नागिरी
प्रतिनिधि रत्नागिरी
रत्नागिरी (खेड) :- गजानन महाराज मंदिर संस्थापक श्री अनंत गणपत दरेकर आणि कै. सौ. लता अनंत दरेकर यांनी स्थापन केले आहे. सदर गजानन महाराज मंदिर हे १९९० पासून कशेडी गावात स्थापित असून, आज २०२३ रोजी ३३ वा प्रकट दिन भक्तांच्या उपस्थित मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. सकाळी सर्व
भक्तांच्या हस्ते महाराजांच्या मुर्तीवर अभिषेक करण्यात आले. गजानन महाराजांच्या जीवनावर आधारित विजय ग्रंथ वाचन करून त्यानंतर मोठ्या भक्ती भावाने कशेडी ग्रामस्थं व भक्त मंडळीनी महाराजांची पालखीतून मिरवणूक काढून गावातील हनुमान मंदिर व ग्रामदेवता श्री.सुकाई कोटेश्वरी या मंदिरामध्ये भेट घेण्यात आली .दुपारी महाआरती व महाप्रसाद रात्री सातपाणेवाडी यांच सुस्वर भजन झाले . सदर मंदिराचे नूतनीकरण करण्याचे काम चालू असून येत्या मे महिन्यापर्यंत जीर्णोद्धार करण्यात येणार आहे.
|
Whatsapp आयकॉन दाबून ही बातमी शेअर करा |
Advertising Space













