नमस्कार आमच्या आजचा महाराष्ट्र टॉप टेन मराठी न्यूज चॅनेल मधे आपल स्वागत आहे...येथे तुम्हाला ताज्या घडामोडी व बातम्या मिळतील... बातम्या व जाहिरातींसाठी संपर्क - +91 9029198881 करा. आमचे YouTube चॅनेल, Facebook, Telegram ला सबस्क्राईब/ लाईक करा. , निती निकेतन बहुउद्धेशीय सेवा भावी संस्था वाघोली संचालित मातोश्री रेवम्मा मुलींचे खुले निवारा गॄह. संस्थेस बाल कल्याण समितीची भेट – आजचा महाराष्ट्र

निती निकेतन बहुउद्धेशीय सेवा भावी संस्था वाघोली संचालित मातोश्री रेवम्मा मुलींचे खुले निवारा गॄह. संस्थेस बाल कल्याण समितीची भेट

प्रतिनिधी स्नेहा उत्तम मडावी

पुणे:- दरवर्षी प्रमाणे नीती निकेतन ही संस्था कार्यक्रम करत असते या संस्थेचे काम गोदावरी ताई ध्याडे प्रमाणिकपणाने करत संपूर्ण वेळ संस्थेला देतात. तसेच संस्थेचे सर्व कर्मचारी या संस्थेमध्ये प्रमाणिकपणाने काम करतात. संपूर्ण महाराष्ट्रात सदर संस्थेचे नाव उच्चतम स्थानी आहे. संस्थे मार्फत राबविण्यात येणाऱ्या विविध सामाजिक बांधिलकीच्या कार्यक्रमाचे आयोजन करत असल्याने

संस्थेवर कौतुकाचा वर्षाव होत आहे. हरवलेल्या मुला मुलींचे या संस्थेत चांगल्या प्रकारे संगोपन केले जाते. सापडलेल्या मुलांना आई वडील वा नातेवाईक यांच्या ताब्यात देतात. पोलिसांना पालकांच्या शोध मोहिमेत मदत करतात. तसेच लहान मुलांना, वयस्कर व्यक्तिंना, फुटपाथवर राहणाऱ्या गरीब कुटूंबाना थंडीपासून बचाव करण्यासाठी चादर, रग, स्वेटर वाटप केली जाते . लॉकडाऊनमध्ये सुद्धा संस्थेने अनेक गरीब कुटूंबाची खाण्या पिण्याची सोय केली. आज रोजी गंगानगर फुरसुंगी पुणे- येथे कार्यरत असलेल्या निती निकेतन बाल संस्था संचलित मातोश्री रेवम्मा मुलींचे खुले निवारा गॄह फुरसुंगी गंगानगर पुणे या संस्थेत मा. बाल कल्याण समिती पुणे

भाग ०२ च्या सर्व सदस्य व मा. अध्यक्षा यांनी सदिच्छा भेट दिली. या वेळी संस्थेच्या प्रोजेक्ट काॅ. जयश्री भारती मॅडम यांनी सर्वाचे स्वागत केले. त्यानंतर संस्थेमध्ये माता रमाबाई आंबेडकर यांच्या जयंती निमित्त रमाई यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात आला. म. बा. क. स अध्यक्षा नंदिता अंबिका मॅडम यांच्या हस्ते दिप प्रज्वलित करण्यात आले . या वेळी सर्व सदस्य एड. परेश खाडिलकर. संध्या गायकवाड.सारीका अगज्ञान तसेच इतर कर्मचारी उपस्थित होते. समितीने संस्थेचे सर्व कामकाज. कागदपत्रे. स्वच्छता पाहुन समाधान व्यक्त केले. 

शेवटी संस्थेच्या सचिव मा. गोदावरी ध्याडे मॅडम यांनी सर्वांचे आभार व्यक्त केले. या वेळी संस्थेचे सोशल वर्कर अमित देशमुख. आउट रिच वर्कर स्नेहा उत्तम मडावी मॅडम. उजवला मॅडम. वनिता ताई. दिपाली ताई. रुपाली ताई. प्राजक्ता ताई इतर कर्मचारी हजर होते.

Whatsapp आयकॉन दाबून ही बातमी शेअर करा 

Advertising Space


मुक्त आणि खऱ्या पत्रकारितेसाठी ती कॉर्पोरेट आणि राजकीय नियंत्रणापासून मुक्त असणे आवश्यक आहे. लोक पुढे येऊन सहकार्य करतील तेव्हाच हे शक्य आहे.

आता दान करा

[responsivevoice_button voice="Hindi Female"]