नमस्कार आमच्या आजचा महाराष्ट्र टॉप टेन मराठी न्यूज चॅनेल मधे आपल स्वागत आहे...येथे तुम्हाला ताज्या घडामोडी व बातम्या मिळतील... बातम्या व जाहिरातींसाठी संपर्क - +91 9029198881 करा. आमचे YouTube चॅनेल, Facebook, Telegram ला सबस्क्राईब/ लाईक करा. , पालीकरांच्या आरोग्याची ऐशीतैशी; रस्त्यात पडणारी क्रशरची वाळू, धूळ देतेय आजारांना निमंत्रण – आजचा महाराष्ट्र

पालीकरांच्या आरोग्याची ऐशीतैशी; रस्त्यात पडणारी क्रशरची वाळू, धूळ देतेय आजारांना निमंत्रण

पत्रकार समीर बामुगडे

रायगड (रोहा) :- सुधागडातील विकास हा तेथील आनंदी माणसे, समृद्ध निसर्ग या ऐवजी तेथे चालू असलेली बांधकामे, सेकंड होम, शेतजमिनीची होणारी विक्री यामध्ये मोजला जातोय. या विकासा सोबत होणारी वाहतूक व धूळ आमच्या आजारांच कारण ठरत असल्याची नागरिकांची तक्रार आहे*.

वाळू काढण्यावर बंदी असल्याने नदीतील वाळूला सध्या क्रश सॅंड आणि वॉश सॅंड हेच फक्त पर्याय आहेत. वॉश सॅंड पूर्णतः बेसॉल्ट दगडापासूनची असते. ती पूर्णतः धूळविरहित आहे. तिची मजबुती नैसर्गिक वाळूइतकी किंबहुना त्यापेक्षा अधिक आहे. यासर्व कारणामुळे क्रशर मालकांना व महसूल विभागाला सोन्याचे दिवस आलेत अशी नागरिकांमध्ये चर्चा आहे. वाहतूक व रस्त्यावर सांडणारी क्रश सॅंड व धूळ आजाराला आमंत्रण देत असल्याचे चित्र आहे.

भिरा पाली मार्गावर होणारी औद्योगिक अवजड वाहतूक ही पालीत अडवली जाते व ती माणगाव मार्गे फिरवली जाते, मग क्रशर सॅंडची वाहतूक आमच्या बोकांडी का? असा प्रश्न पालीकर विचारत आहेत. रॉयल्टी व पर्यावरणाच कारण देवून क्रशर खाणींवर दबाव आणायचा व ठराविक क्रशर खाणीला मदत करायची हे उद्योग शासकीय अधिकारी करीत असल्याची कुजबूज सुरू आहे. या क्रशरमध्ये एक राजकीय नेता व महसूल विभागातील अधिकारी यांची छुपी पार्टनरशिप असल्याची देखील चर्चा आहे. त्यांचे नाव सांगायला नागरिक तयार नसल्याने, नागरिकांच्या मनात काय दहशत असेल याची कल्पना येते.

या प्रकरणामुळे नागरिकांच्या मनात बरेच प्रश्न उभे राहिले आहेत. वाहतुकीमुळे उडणारी धूळ ही सर्दी, खोकला, दमा याला आमंत्रण देत असून यावर संबधित कारवाई करणार की मूग गिळून गप्प बसणार? सुधागड तालुका म्हणजे दुभती गाय आहे का? तालुक्यात जमवलेली माया व मालमत्ता पाहता हे अधिकारी तालुक्याला लुटायला व वसूली करायलाच आलेत का? प्रशासन व राजकीय नेते छुपी युती करून आमच्या विरोधात काम करीत असतील तर न्याय कोणाकडे मागायचा? या सर्वांची उत्तरे कधी मिळतील माहीत नाही परंतु सध्या पर्यावरण व आम्ही नागवले जातोय हे मात्र नक्की.

Whatsapp आयकॉन दाबून ही बातमी शेअर करा 

Advertising Space


मुक्त आणि खऱ्या पत्रकारितेसाठी ती कॉर्पोरेट आणि राजकीय नियंत्रणापासून मुक्त असणे आवश्यक आहे. लोक पुढे येऊन सहकार्य करतील तेव्हाच हे शक्य आहे.

आता दान करा

[responsivevoice_button voice="Hindi Female"]