नमस्कार आमच्या आजचा महाराष्ट्र टॉप टेन मराठी न्यूज चॅनेल मधे आपल स्वागत आहे...येथे तुम्हाला ताज्या घडामोडी व बातम्या मिळतील... बातम्या व जाहिरातींसाठी संपर्क - +91 9029198881 करा. आमचे YouTube चॅनेल, Facebook, Telegram ला सबस्क्राईब/ लाईक करा. , माजी सैनिक संघ (रजि.) यांचे वतीने तिसंगी येथे गणतंत्र दिन साजरा – आजचा महाराष्ट्र

माजी सैनिक संघ (रजि.) यांचे वतीने तिसंगी येथे गणतंत्र दिन साजरा

पत्रकार राजेंद्र दळवी 

रत्नागिरी (खेड) :- माजी सैनिक संघ तिसंगी (रजि.) व सैनिक ग्रंथालय तिसंगी यांच्या संयुक्त विद्यमाने तिसंगी नवनगर येथील *सैनिक भवन* येथे देशाचा ७४ वा गणतंत्र दिन साजरा करण्यात आला. कै. बाबाजीराव धोंडबाराव भोसले यांच्या स्मरणार्थ उभारण्यात आलेल्या युद्ध स्मारकाला हवालदार श्री.शामसुंदर रघुनाथ

कदम यांचे हस्ते पुष्पचक्र अर्पण करण्यात आले. यानंतर माजी सैनिक संघ तिसंगीचे अध्यक्ष नायक श्री.परशुराम बाजीराव भोसले यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. या राष्ट्रीय सणाचे औचित्य साधत गावात एक दिशादर्शक सकारात्मक निर्णय घेऊन ग्रामपंचायत निवडणूक -२०२३ बिनविरोध करून विजयी झालेल्या सर्व नवनिर्वाचित ग्राम पंचायत सदस्यांचा माजी सैनिक संघ व वाचनालय

यांचे वतीने जाहीर सत्कार करण्यात आला. याप्रसंगी सरपंच महोदया सौ.मनीषा चंद्रकांत काजारे, उपसरपंच सौ. स्नेहल नंदकिशोर भोसले, ग्रामपंचायत सदस्य/सदस्या सौ. संजीवनी संतोष पिंपळकर, सौ.सपना सुरज भोसले, श्री. प्रमोद राजाराम भोसले, श्री.प्रमोद भिकाजी भोसले, श्री.अशोक रामचंद्र गमरे,श्री. संतोष अनंत आखाडे, सौ. स्मिता शशिकांत भोसले श्रीम. लीला धोंडू यादव यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी नूतन इंग्लिश स्कूल तिसंगीचे मुख्याध्यापक यांनी अध्यापन क्षेत्रात केलेल्या कार्याबद्दल महाराष्ट्र राज्य मुख्याध्यापक महामंडळच्या वतीने आदर्श मुख्याध्यापक या राज्यस्तरीय पुरस्काराने गौरवण्यात आल्याबद्दल त्यांच्या शैक्षणिक क्षेत्रातील या योगदानाबद्दल संघटनेच्या वतीने जाहीर सत्कार करण्यात आला. 

      तसेच या प्रसंगी भारतीय सैन्यात असताना ज्या खेळाडूंनी कार्यरत काळामध्ये आपले विशेष योगदान दिले त्यांचाही माजी सैनिक संघ व ग्रंथालय यांचे वतीने जाहीर सत्कार करण्यात आला. यामध्ये सुभेदार श्री. सदाशिव धोंडबाराव भोसले (जिम्नॅस्टिक), ऑननरी नायक सुभेदार श्री. बाजीराव गोविंदराव भोसले (स्विमिंग), ऑननरी कॅप्टन कै. भिकाजीराव गोविंदराव भोसले (माजी ओलंपिक खेळाडू) यांचे चिरंजीव श्री. संभाजी भिकाजीराव भोसले (रणजी खेळाडू- क्रिकेट) हवालदार श्री.शामसुंदर रघुनाथ कदम (बॉक्सिंग), हवालदार श्री.नंदकुमार रघुनाथ भोसले(प्यारा जम्प) माजी सैनिक संघ तिसंगी उपाध्यक्ष नायक श्री.नरसिंग बाबाजीराव भोसले (बास्केट बॉल), नायक श्री. काशीराम कृष्णाजीराव भोसले (क्रॉस कंट्री) यांचा सत्कार करण्यात आला. सदर कार्यक्रमास माजी सैनिक संघ, ग्रंथालय यांचे पदाधिकारी, सदस्य यांचेसह गावातील अन्य मान्यवर व ग्रामस्थ उपस्थित होते. शेवटी उपस्थितांचे आभार मानून कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.

Whatsapp आयकॉन दाबून ही बातमी शेअर करा 

Advertising Space


मुक्त आणि खऱ्या पत्रकारितेसाठी ती कॉर्पोरेट आणि राजकीय नियंत्रणापासून मुक्त असणे आवश्यक आहे. लोक पुढे येऊन सहकार्य करतील तेव्हाच हे शक्य आहे.

आता दान करा

[responsivevoice_button voice="Hindi Female"]