नमस्कार आमच्या आजचा महाराष्ट्र टॉप टेन मराठी न्यूज चॅनेल मधे आपल स्वागत आहे...येथे तुम्हाला ताज्या घडामोडी व बातम्या मिळतील... बातम्या व जाहिरातींसाठी संपर्क - +91 9029198881 करा. आमचे YouTube चॅनेल, Facebook, Telegram ला सबस्क्राईब/ लाईक करा. , श्रीवर्धन कुणबी समाज कै ग. स. कातकर सभागृहात सार्थक व्याख्यानमालेचे आयोजन विद्यार्थ्यांनी अभ्यासाचे नियोजन कसे करावे याबाबत माजी नगराध्यक्ष जितेंद्र सातनाक यांनी दिली माहिती – आजचा महाराष्ट्र

श्रीवर्धन कुणबी समाज कै ग. स. कातकर सभागृहात सार्थक व्याख्यानमालेचे आयोजन विद्यार्थ्यांनी अभ्यासाचे नियोजन कसे करावे याबाबत माजी नगराध्यक्ष जितेंद्र सातनाक यांनी दिली माहिती

पत्रकार रामचंद्र घोडमोडे

रायगड (श्रीवर्धन) :- श्रीवर्धन येथील कुणबी समाज कै. ग स कातकर सभागृहात सार्थक व्याख्यान मालेच्या माध्यमातून दहावी बारावीच्या विद्यार्थ्यांनी पेपर कसा सोडवावा याविषयी व्याख्यान मालेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी श्रीवर्धन नगरपरिषदेचे माजी नगराध्यक्ष जितेंद्र सातनाक यांनी विद्यार्थ्यांना संबोधित केले. विद्यार्थ्यांनी आपल्या अभ्यासाचे नियोजन करून नियोजनबद्ध पद्धतीने पेपरला सामोरे गेल्यास यश निश्चितच मिळते .आपण गेली वर्षभर अतिशय मेहनतीने अभ्यास करत आहात. भविष्य उज्वल करण्यासाठी तारुण्यात कष्ट केल्यास निश्चितच आगामी काळ सुखदायक असतो. आज सार्थक व्याख्यान मालेच्या माध्यमातून आपणास विविध तज्ञ व्यक्तींचे मार्गदर्शन मिळणार आहे.त्या मार्गदर्शनाचा आपण पुरेपूर फायदा घ्यावा असे जितेंद्र सातनाक यांनी सांगितले . मेघरे येथील सामाजिक कार्यकर्ते महेश पवार यांनी मुंबई उपनगरातून श्रीवर्धन तालुक्यातील विद्यार्थ्यांसाठी सार्थक व्याख्यान मालेचे आयोजन केले होते .कार्यक्रम प्रसंगी दीपक शिर्के चंद्रकांत उंदीलकर , दशरथ कातकर ,रत्नाकर लांबाडे, आणि मार्गदर्शन करण्यासाठी उपस्थित शिक्षक दीपक सकपाळ, सागर इप्ते, गीतांजली सकपाळ आदी मान्यवर उपस्थित होते . मार्गदर्शन ऐकण्यासाठी श्रीवर्धन तालुक्यातील विविध शाळांचे विद्यार्थी मोठ्या संख्येने कार्यक्रम प्रसंगी उपस्थित होते .

Whatsapp आयकॉन दाबून ही बातमी शेअर करा 

Advertising Space


मुक्त आणि खऱ्या पत्रकारितेसाठी ती कॉर्पोरेट आणि राजकीय नियंत्रणापासून मुक्त असणे आवश्यक आहे. लोक पुढे येऊन सहकार्य करतील तेव्हाच हे शक्य आहे.

आता दान करा

[responsivevoice_button voice="Hindi Female"]