नमस्कार आमच्या आजचा महाराष्ट्र टॉप टेन मराठी न्यूज चॅनेल मधे आपल स्वागत आहे...येथे तुम्हाला ताज्या घडामोडी व बातम्या मिळतील... बातम्या व जाहिरातींसाठी संपर्क - +91 9029198881 करा. आमचे YouTube चॅनेल, Facebook, Telegram ला सबस्क्राईब/ लाईक करा. , श्रीवर्धन गावचे सुपुत्र अजित मापुस्कर यांच्याकडून वयाच्या ६१ व्या वर्षी उत्तराखंड येथील १२५०० फुटावरील केदार खंड शिखर सर – आजचा महाराष्ट्र

श्रीवर्धन गावचे सुपुत्र अजित मापुस्कर यांच्याकडून वयाच्या ६१ व्या वर्षी उत्तराखंड येथील १२५०० फुटावरील केदार खंड शिखर सर

पत्रकार रामचंद्र घोडमोडे

रायगड (श्रीवर्धन):- श्रीवर्धन गावचे सुपुत्र अजित विनायक मापुस्कर यांनी वयाच्या ६१ व्या वर्षी हिमालयीन हायकर्स या संस्थेने आखलेल्या मोहिमेत सहभागी होऊन उत्तराखंड मधील उत्तर काशी जिल्ह्यातील १२५०० फुटावरील केदार खंड हे शिखर सर करून

तरुणांपुढे एक नवा आदर्श ठेवला आहे. या मोहिमेत त्यांच्या तुकडीत भारतातून १२ जणांचा समावेश होता.यामध्ये महाराष्ट्र मधून अभय केळुसकर. पुष्कर. मनाली चाफळे .सुदर्शन. संकेत .तसेच बिहार. पटना. आग्रा. गुजरात.राज्यांतील सहकारी सहभागी झाले होते. उत्तराखंड मधील गिर्यारोहक महावीरजी व केदार सिंग राणा. यांच्या मार्गदर्शनाखाली ६ दिवसांची ही मोहीम यशस्वी केली. या अगोदर

अजित मापुस्कर यांनी हिमाचल प्रदेशातील कालाटोप. सारपास चंद्रखणी. पास सरनसांगला उत्तराखंड मधील व्हॅली ऑफ फ्लावर. नैनीताल. दार्जिलिंग मधील संडाफू नेपाळमधील कालापत्थर. इत्यादी मोहिमां मध्ये सहभागी होऊन त्या यशस्वी पणे पूर्ण केल्या आहेत. तसेच जेसलमेर डेसर्ट ट्रेक. व इंडियन माउंटनीअरनिंग इन्स्टियुट तर्फे तर्फे त्यांनी १४ दिवसांचा स्लो स्कीइंग कोर्स देखील केला आहे.पुन्हा १७ वर्षानंतर वयाच्या ६१ व्या वर्षी ही मोहीम यशस्वी करून तरुणांपुढे एक नवा आदर्श ठेवला आहे विशेष म्हणजे केदार खंड शिखराचा शेवटचा टप्पा रात्रीच्या अंधारात सुरुवात करून पहाटे ६.४५ मिनिटांनी उगवत्या सूर्यनारायणाच्या साक्षीने सर केल्याचे त्यांच्या कडून सांगण्यात आले.

Whatsapp आयकॉन दाबून ही बातमी शेअर करा 

Advertising Space


मुक्त आणि खऱ्या पत्रकारितेसाठी ती कॉर्पोरेट आणि राजकीय नियंत्रणापासून मुक्त असणे आवश्यक आहे. लोक पुढे येऊन सहकार्य करतील तेव्हाच हे शक्य आहे.

आता दान करा

[responsivevoice_button voice="Hindi Female"]