रोहा पोलिसांचा धोंडखार जंगल भागातील गावठी हातभट्टी दारूच्या अड्ड्यावर छापा

रायगड (रोहा) :- रोहा पोलीस ठाणे हद्दीत धोंडखार गावचे हद्दीतील जंगल भागात अवैध गावठी दारू अड्ड्यावर पोलिसांचा छापा. कारवाई मुद्देमाल केला नष्ट.

रोहा पोलिस स्टेशनचे कर्तव्यदक्ष पोलिस निरीक्षक प्रमोद बाबर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक – हिवरकर,उपनिरीक्षक-मदगे, पोलिस हवालदार ठाकूर, पारवे, कुथे यांनी सापळा रचून जंगल भागत सूरु असलेल्या गावठी हातभट्टी दारू अड्ड्यावर छापा टाकला. पोलिस निरीक्षक प्रमोद बाबर यांना मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे पोलिसांकडून ही कारवाई करण्यात आली आहे.

धोंडखार गावच्या हद्दीत जंगल भागत गावठी हातभट्टी दारू तयार करण्यात येत असल्याची माहिती मिळाली होती. त्या आधारे पोलिस पथकाने जंगल भागात गस्त सुरू केली. रोहा पोलीस व वनविभाग रोहा यांनी संयुक्तपणे कारवाई करत दारुच्या अड्ड्यावर छापा टाकला.धोंडखार भागात जंगल ठिकाणी जुने पडीक शौचालय शेजारी ठेवलेले गुलमिश्रित रसायनांचे भरलेले ४ कॅन मिळून आले 
सदरचा मुद्देमाल पोलीसांनी जागीच ओतून व कॅन जाळून नष्ट करण्यात केला आहे.अंदाजे ८२,000 हजार रुपये किमतीचे गुलमिश्रित रसायन भरलेले २ प्लॅस्टिक कॅन जाळून नष्ट करण्यात आले. रोहा पोलिस व वनविभागाचे वनपाल हंबिर यांच्या पथकाने जंगल भागात शोध घेउन धडक कारवाई केली आहे.
|
Whatsapp आयकॉन दाबून ही बातमी शेअर करा |
Advertising Space













