यंदा वर्षातील पहिल्या व अखेरच्या अंगारकी संकष्टी चतुर्थीला नांदगावच्या श्री सिद्धिविनायक मंदिरात भाविकांची मंदियाळी.
पत्रकार बाबुराव गोळे
रायगड (मुरुड) जंजिरा :- यंदा नुतन २०२३ या वर्षातील एकमेव असलेल्या पहिल्या व अखेरच्या अंगारकी योग लाभलेल्या संकष्टी चतुर्थीला मुरुड तालुक्यातील नांदगावच्या सुप्रसिध्द श्री सिद्धिविनायक मंदिरात दर्शनासाठी भाविकांची मोठी मंदियाळी दिसून आली.
मंदिराचे सालकर गुरुजी शैलेश गजानन जोशी ,सेवा मंडळाचे पुजारी महेश गोविंदराव जोशी व विनायक पुरुषोत्तम जोशी यांनी पहाटे षोडशोपचारे श्रींची पाद्यपूजा केली त्यानंतर मंदिर भाविकांना दर्शनासाठी खुले करण्यात आले.
मुरुड तालुक्यात सध्या तापमानाचा पारा पुरता घसरला असल्याने बोचरी थंडी व दाट धुके यामुळे पहाटेच्या वेळी गर्दी कमी होती परंतु दहा वाजल्यापासून मुरुड तालुक्यातील विविध गावांतील भाविकांसह बाहेरील पर्यटक भक्तगणांनी दर्शनासाठी मंदिर परिसरात रांगा लावल्या होत्या.सायंकाळीही मंदिरात मोठी गर्दी दिसून आली.

दर्शनासाठी आलेल्या भाविकांना उन्हाचा त्रास होऊ नये व त्यांना रांगेत उभे राहता यावे यासाठी मंदिराच्या पटांगणात मंडप उभारण्यात आला होता.पटांगणाबाहेर हार, फुले,नारळ,पेढे,बर्फी ,केळी व अन्य पुजेच्या साहित्याची विक्री करणारे स्टॉल लावण्यात आले होते.सायंकाळी स्थानिक भजनी मंडळांनी सुस्वर भजने सादर केली.येत्या २५ जानेवारी रोजी माघ शुद्ध चतुर्थीला श्री सिद्धिविनायकाचा माघी उत्सव साजरा करण्यात येणार असून या वर्षी मंदिराच्या पटांगणात जत्रेचे स्टॉल अथवा दुकाने थाटण्यास मंदिराच्या चिटणीस -गुप्ते कौटुंबिक ट्रस्टने बंदी घातली असल्याचे कळते.
|
Whatsapp आयकॉन दाबून ही बातमी शेअर करा |
Advertising Space













