खेड ता. खवटी प्रभाग स्तरीय शिक्षण परिषद व गुणगौरव सोहळा उत्साहात संपन्न

रत्नागिरी (खेड) – खवटी प्रभागस्तरीय शिक्षण परिषद व गुणगौरव सोहळा श्री. गणेश मंगल कार्यालय भरणे येथे मोठ्या उत्साहात श्री संतोष भोसले (शिक्षण विस्तार अधिकारी )यांच्या अध्यक्षतेखाली व केंद्रीय प्रमुख श्री भाऊराव दराणे व अंकुश उंडे यांच्या उपस्थितीत संपन्न झाली.

नातूनगर नं.१ शाळेतील विद्यार्थी श्रवण जाधव, धामणी नं.१ शाळेतील विद्यार्थिनी शमिका विचारे व आंबये पाटील शाळेतील विद्यार्थी आरूष धोत्रे यांचे औक्षण करून अनोख्या पद्धतीने शिक्षण परिषदेत स्वागत करण्यात आले.श्री.चंद्रकांत रेवाळे सर त्यांच्या टीमने अत्यंत सुंदर अशी प्रार्थना सादर केली तसेच ज्ञानदेव लेंभे सर यांनी एक गीत सादर केले. कार्यक्रमाचे प्रास्तविक शिक्षण विस्तार अधिकारी श्री. संतोष भोसले साहेब यांनी केले. त्यानंतर गुणवंत विद्यार्थी श्रवण जाधव, शमिका विचारे व आरुष धोत्रे यांचा तसेच त्यांच्या पालकांचा मार्गदर्शक शिक्षक व शाळेचे मुख्याध्यापक यांचा यथोचित सन्मान करण्यात आला.

एक अत्यंत नाविन्यपूर्ण उपक्रम म्हणजे गुणवंत विद्यार्थी त्यांचे पालक व मार्गदर्शक शिक्षक आणि मुख्याध्यापक यांच्या मुलाखती घेण्यात आल्या. या मुलाखती स्वतः श्री.संतोष भोसले साहेबांनी घेतल्या. यावेळी विद्यार्थी व पालकांनी देखील मनमोकळेपणाने आपली मते व्यक्त केली .

रत्नागिरी जिल्हा परिषदेने विविध उपक्रम सुरू केले आहेत. यातील नासा व इस्त्रो याबद्दल केंद्रीय प्रमुख श्री भाऊराव दराणे यांनी सविस्तर माहिती दिली.सायबर सुरक्षा याविषयी सविस्तर माहिती केंद्रीय प्रमुख श्री अंकुश उंडे यांनी दिली.

दुपारच्या सत्रात गटशिक्षणाधिकारी श्री श्रीधर शिगवण साहेब यांनी शिक्षण परिषदेला भेट दिली. प्रभागातील शिष्यवृत्ती परीक्षेतील निकालाचे व विद्यार्थ्यांचे त्यांनी कौतुक केले. तसेच बदलत्या काळानुसार आधुनिक डिजिटल पद्धतीने शिक्षण देण्याचे प्रयत्न करावेत असे आवाहन त्यांनी शिक्षकांना केले. अधिकाधिक प्रयत्न करून विद्यार्थी गुणवत्ता वाढविण्याचे आवाहन त्यांनी यावेळी केले.

खवटी प्रभागातील सर्व शिक्षकांच्या वतीने श्री संतोष भोसले साहेबांचा यथोचित सन्मान करण्यात आला तसेच यावेळी अनेक शिक्षकांनी आपली मनोगते व्यक्त केली.
प्रशासकीय मार्गदर्शन श्री संतोष भोसले यांनी केले विद्यार्थ्यांचे व शिक्षकांचे कौतुक करून यापुढे देखील गुणवत्ता वाढीसाठी सर्वांनी प्रयत्न करावेत असे आवाहन केले.

संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्र संचालन श्री.शरद भोसले यांनी केले तर आभार श्री.राहुल तुगांवकर यांनी मानले. परिषदेच्या यशस्वीतेसाठी श्री पर्शुराम पेवेकर, श्री.महेश जाडे, येडू केकाण तुगांवकर सर व नकाशे सर यांनी सहकार्य केले. या परिषदेसाठी आंबये, धामणी, नातूनगर व खवटी केंद्रातील शिक्षक उपस्थित होते.
|
Whatsapp आयकॉन दाबून ही बातमी शेअर करा |
Advertising Space













