नमस्कार आमच्या आजचा महाराष्ट्र टॉप टेन मराठी न्यूज चॅनेल मधे आपल स्वागत आहे...येथे तुम्हाला ताज्या घडामोडी व बातम्या मिळतील... बातम्या व जाहिरातींसाठी संपर्क - +91 9029198881 करा. आमचे YouTube चॅनेल, Facebook, Telegram ला सबस्क्राईब/ लाईक करा. , भडगांव खोंडे तंटामुक्त समितीच्या अध्यक्षपदी महादेव नारायण म्हस्के यांची बिनविरोध निवड करण्यात आली – आजचा महाराष्ट्र

भडगांव खोंडे तंटामुक्त समितीच्या अध्यक्षपदी महादेव नारायण म्हस्के यांची बिनविरोध निवड करण्यात आली

पत्रकार राजेंद्र दळवी

रत्नागिरी (खेड) :- शहराजवळील भडगांव-खोंडे गावच्या तंटामुक्त समितीच्या अध्यक्षपदी सेवानिवृत्त पोलीस निरीक्षक श्री.महादेव नारायण म्हस्के यांची सर्वानुमते निवड करण्यात आली.भडगांव खोंडे ग्रामपंचायतीच्या छत्रपती शिवाजी महाराज सभागृहात श्री.सुरेश उसरे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या ग्रामसभेत हि निवड करण्यात आली .तंटामुक्त समितीच्या अध्यक्षपदासाठी श्री. म्हस्के यांचे नाव अनंत लाले यांनी सुचविले. त्यांना विजय दवडे यांनी अनुमोदन दिले. त्यानंतर ग्रामविकास अधिकारी भास्कर देवकाते यांनी श्री. म्हस्के यांची तंटामुक्त समितीच्या अध्यक्षपदी सर्वानुमते

निवड झाल्याचे जाहिर केले.ग्रामसभेला उपस्थित असलेले सर्व ग्रामस्थ बंधू-भगिनींसह सरपंच, उपसरपंच,मावळते तंटामुक्त अध्यक्ष सुरेश चिकने ,सदस्य, सदस्या व सर्व समित्यांच्या पदाधिकारी, सदस्यांनी श्री. म्हस्के यांचे अभिनंदन करून त्यांना शुभेच्छा दिल्या. नुकतीच त्यांच्या निवासस्थानी काही ग्रामस्थांनी भेट देऊन श्री. म्हस्के यांचे अभिनंदन केले. यावेळी प्रदीप कांबळे, सुरज जोगळे, रविंद्र जोगळे, विजय दवंडे ,राजेश कदम, अनंत लाले, परशुराम दवडे, प्रमोद उसरे, दिवाकर प्रभु ,गणेश बैकर आदींची उपस्थिती होती.

Whatsapp आयकॉन दाबून ही बातमी शेअर करा 

Advertising Space


मुक्त आणि खऱ्या पत्रकारितेसाठी ती कॉर्पोरेट आणि राजकीय नियंत्रणापासून मुक्त असणे आवश्यक आहे. लोक पुढे येऊन सहकार्य करतील तेव्हाच हे शक्य आहे.

आता दान करा

[responsivevoice_button voice="Hindi Female"]