नमस्कार आमच्या आजचा महाराष्ट्र टॉप टेन मराठी न्यूज चॅनेल मधे आपल स्वागत आहे...येथे तुम्हाला ताज्या घडामोडी व बातम्या मिळतील... बातम्या व जाहिरातींसाठी संपर्क - +91 9029198881 करा. आमचे YouTube चॅनेल, Facebook, Telegram ला सबस्क्राईब/ लाईक करा. , अखिल भारतीय ग्राहक पंचायतची मासिक सभा खेड येथे बहुसंख्य नागरिकांच्या उपस्थित संपन्न झाली. – आजचा महाराष्ट्र

अखिल भारतीय ग्राहक पंचायतची मासिक सभा खेड येथे बहुसंख्य नागरिकांच्या उपस्थित संपन्न झाली.

पत्रकार राजेंद्र दळवी

रत्नागिरी (खेड) :- अखिल भारतीय ग्राहक पंचायत-खेड ची बुधवार दिनांक १४/०९/२०२२ रोजी मासिक सभा संपन्न झाली. यावेळी रत्नागिरी जिल्हा विभागाच्या झालेल्या मिटिंगचा आढावा सांगण्यात

आला. वर्षभरात जे उपक्रम राबविण्यात येणार आहेत त्यावर चर्चाकरण्यात आली.सदस्य नोंदणी वाढविण्यास मार्गदर्शन करण्यात आले.महिला जागरण सप्ताह आयोजित करण्याबाबत चर्चा करण्यात आली.तसेच ‘स्वावलंबी भारत अभियान ‘ राबवण्याबाबत निर्णय घेण्यात आला. ग्रामीण भागात अखिल भारतीय ग्राहक पंचायतचे प्रबोधन घडवून आणण्यात अधिक भर देण्यात यावा असा निर्णय घेण्यात आला.

या सभेला खेड तालुका अध्यक्ष प्रा.लक्ष्मण आखाडे, उपाध्यक्ष प्रा.विपिन शिंदे , श्री.भूषण काणे, सचिव श्री.संतोषजी दोडेकर, कोषाध्यक्ष श्री.सचिन मोरे, महिला संघटक सौ.समृद्धी भुवड, सहकोषाध्यक्ष श्री.अजित तटकरी, संघटनमंत्री श्री.विजयराव येरुणकर तसेच अनेक सदस्य उपस्थित होते.

Whatsapp आयकॉन दाबून ही बातमी शेअर करा 

Advertising Space


मुक्त आणि खऱ्या पत्रकारितेसाठी ती कॉर्पोरेट आणि राजकीय नियंत्रणापासून मुक्त असणे आवश्यक आहे. लोक पुढे येऊन सहकार्य करतील तेव्हाच हे शक्य आहे.

आता दान करा

[responsivevoice_button voice="Hindi Female"]