नमस्कार आमच्या आजचा महाराष्ट्र टॉप टेन मराठी न्यूज चॅनेल मधे आपल स्वागत आहे...येथे तुम्हाला ताज्या घडामोडी व बातम्या मिळतील... बातम्या व जाहिरातींसाठी संपर्क - +91 9029198881 करा. आमचे YouTube चॅनेल, Facebook, Telegram ला सबस्क्राईब/ लाईक करा. , ९ मार्च पासून नवीन ऑटो रिक्षा परवान्यांना स्थगिती.. – आजचा महाराष्ट्र

९ मार्च पासून नवीन ऑटो रिक्षा परवान्यांना स्थगिती..

प्रतिनिधी

परिवहन मंत्री प्रताप सरनाईक

मुंबई : वाढती वाहतूक कोंडी, व शहरी प्रदूषणाला आळा घालण्यासाठी आज ९ मार्चपासून राज्यभर नवीन ऑटो रिक्षांना परवाना देण्यास स्थगिती देण्यात येत आहे, असल्याची घोषणा परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी केली. तथापि, राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत नवीन ऑटो रिक्षांना कोणत्या निकषांवर नवीन परवाने द्यावेत,या संदर्भात निर्णय घेतला जाईल, त्यानूसार पुढील निर्णय घेतला जाणार आहे.अलसेही सरनाईक यांनी सांगितले. मंत्री सरनाईक म्हणाले की, महाराष्ट्रातील ५ लाखांपेक्षा जास्त लोकसंख्या असलेल्या शहरांमध्ये ऑटो रिक्षा परवान्यांबाबत निर्णय घेण्याचे अधिकार राज्य सरकारकडे असल्याचे भारत सरकारच्या रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्रालयाने स्पष्ट केले आहे. त्या स्थानिक परीस्थिती नूसार महाराष्ट्र शासनाला याबाबत निर्णय घेण्याचा सल्ला दिला आहे. परिवहन मंत्री या नात्याने यांनी या संदर्भात केंद्र सरकारकडे केलेल्या पत्रव्यवहारानंतर केंद्राने कार्यालयीन स्मरणपत्राद्वारे ही माहिती दिली आहे. मोटार वाहन (दुरुस्ती) अधिनियम, २०१९ अंतर्गत राज्य सरकारांना वाहतूक व्यवस्थेचे नियमन करण्यासाठी आवश्यक लवचिकता देण्यात आली असल्याचेही यात नमूद करण्यात आले आहे.राज्यातील नागरिकांना अधिक चांगली आणि सुलभ वाहतूक सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी शासन लवकरच आवश्यक त्या धोरणात्मक निर्णयांवर विचार करणार आहे.

Whatsapp आयकॉन दाबून ही बातमी शेअर करा 

Advertising Space


मुक्त आणि खऱ्या पत्रकारितेसाठी ती कॉर्पोरेट आणि राजकीय नियंत्रणापासून मुक्त असणे आवश्यक आहे. लोक पुढे येऊन सहकार्य करतील तेव्हाच हे शक्य आहे.

आता दान करा

[responsivevoice_button voice="Hindi Female"]