छत्रपती शिवाजीमहाराज यांची जयंती आय.ई.एस.हायस्कूल मधे साजरी
प्रतिनिधी
रायगड (अलिबाग) :– वरसोली येथील ईडीयन एज्युकेशन सोसायटीच्या हायस्कूल मधे प्रमुख पाहुणे रायगड भूषण प्रा.डॉ.जयपाल पाटील व सन्मानिय पाहुणे अँड. श्रीराम ठोसर तर कार्यक्रम अध्यक्ष शाळेचे मुख्याध्यापक श्री.किरण पाटील हे होते.प्रारंभी राजे छत्रपती शिवाजीमहाराज यांच्या प्रतिमेस पुष्पहार, दिप प्रज्वलन, पाहुण्याच्या हस्ते करण्यात आले.यावेळेस पाहुण्यांचे स्वागत मुख्याध्यापक श्री.किरण पाटील यांनी केले.यावेळी अँड. 
श्रीराम ठोसर यांनी मुलांना राजांचा जन्माचा इतिहास, आई-वडील आणी गुरुजनांचा आदर नियमित ठेवून अदिलशाही व निजाम शाहीला कौशल्याने कसे जेरीस आणले याची माहीती देऊन जनतेच्या कल्याणासाठी सर्व धर्म भाव कसा जपला हे सांगुन प्रताप गडावरील अफझलखानाचा वधाची माहीती दिली.
यावेळेस शाळेतील कु.प्रणव हुले, कुमारी अपुर्वा भगत,कुमारी दिया बना, कुमारी अनघा पाटील, कु.नैतिक गांवड,कुमारी हर्षदा कोळी,कुमारी श्रेया गौतम,कुमारी तन्वी घरत,उर्वी घरत यांनी छत्रपती शिवाजीमहाराज यांच्या विषयी भाषणे केली.यावेळी डॉ.जयपाल पाटील यांनी सांगितले.की बालमित्रांनो तुम्ही देशाचे आधारस्तंभ आहात.एक कायम लक्षात ठेवा स्वताच्या प्रदेशात प्रत्त्येक जण सिंह असतोपण स्वराज्याचा दरारा जन्मल्या नंतर अवघ्या दशकात हजारो किलोमीटर दुर मस्कत पर्यंत पोहचविणारे, सागरी भुगोलाची नसतांनाही सामर्थ्यवान आरमार केले ते आपले राजे छत्रपती शिवाजीमहाराज होत, आणी आपण सारे भाग्यवान आहोत अलिबागचे कांन्होजी आंग्रे त्याच्या आरमाराचे सरखेल होते ,राज्याच्या असंख्य गुणांपैकी एक गुण जरी आत्मसात केलात तर आपल्या आई-वडीलांचे,गावाचे,शाळेचे नांव उज्वल कराल असे सांगितले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री.आशुतोष गुरव सर यांनी केले.तर आभार श्रीमती पुजा पाटील यांनी मानले.
|
Whatsapp आयकॉन दाबून ही बातमी शेअर करा |
Advertising Space













