गजाननराव पांडुरंग पाटील महाविद्यालयात ३९६ वी शिवजयंती मोठया उत्साह पुर्ण वातावरणात साजरी!
प्रतिनिधी
ठाणे :- दि. २० (स्व.रा.तो) जनाबाई विकास संस्थेच्या वतीने संचालित गजाननराव पांडुरंग पाटील कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालयात शिवजयंतीचे औचित्य साधून गुरुवार दिनांक १९/२/२०२६ रोजी ‘शिवज्योती उत्सव’ व पदवीदान समारंभ मोठ्या उत्साहात संपन्न झाला. सकाळी १० ते १२ या वेळेत आयोजित कार्यक्रमाला मान्यवरांसह आजी-माजी विद्यार्थी आणि ग्रामस्थांची मोठ्या संख्येने उपस्थिती लाभली.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जनाबाई विकास संस्थेचे संस्थापक अध्यक्ष श्री.सुरेश दादा पाटील 
होते. तर प्रमुख पाहुणे म्हणून श्री. नेताराम म्हस्के (वरिष्ठ पोलीस निरीक्षक),दै.स्वराज्य तोरणचे संपादक डॉ.श्री. किशोर बळीराम पाटील,श्रीमंती रेखा पाटील (सरपंच ग्रामपंचायत कोन), दिपाली कराळे (उपसरपंच ग्रामपंचायत कोन),), मनीष महाजन (ग्रामविकास अधिकारी ग्रामपंचायत कोन), गिरीष म्हात्रे (माजी. पंचायत समिती सदस्य), चंद्रकांत दादा पाटील (उपाध्यक्ष भाजपा), भरत जाधव (आरपीआय अध्यक्ष), प्रा. श्रीराम पाटील, साहित्यिक निळकंठ पाटील, महाविद्यालयाचे सेक्रेटरी विजयानंद (बाळू) पाटील आदी मान्यवर उपस्थित होते. तसेच जे. के. म्हात्रे (वरिष्ठ लिपिक, ग्रामपंचायत कोन), अंकुश मुकादम (पाणीपुरवठा अधिकारी), क्रीडा विभाग प्रमुख सतीश म्हात्रे, पत्रकार अफसर खान, प्रा. विनोद पाटील, ग्रामपंचायतीचे सर्व सदस्य उपस्थित होते.कार्यक्रमात विविध मान्यवरांचा यथोचित सत्कार करण्यात आला. सचिन कराळे यांची वीज मंडळ कर्मचाऱ्यांच्या ठाणे जिल्हा अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल त्यांचा गौरव करण्यात आला.तर न्यूज पेपर असोसिएशनतर्फे ‘जीवन गौरव’ पुरस्कार मिळाल्याबद्दल दै.स्वराज्य तारण चे संपादक डॉ.श्री.किशाेर बळीराम पाटील यांचा सत्कार करण्यात आला. आंतरराष्ट्रीय धावपटू एकनाथ दादा पाटील यांनी आशियाई स्पर्धेत रौप्यपदक पटकावल्याबद्दल त्यांचा गौरव करण्यात आला. तसेच मुंबई विद्यापीठ कुस्ती स्पर्धा २०२५ मध्ये सुवर्ण व रौप्य पदक विजेत्या विद्यार्थ्यांचा विशेष सत्कार करण्यात आला.सन २०२४-२५ मधील उत्तीर्ण पदवीधर विद्यार्थ्यांचा पदवीदान समारंभ मान्यवरांच्या हस्ते पार पडला. विद्यार्थ्यांनी ‘पाळणा पोवाडा’सह विविध सांस्कृतिक कार्यक्रम सादर करून उपस्थितांची मने जिंकली.कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्राचार्य विक्रांत ठाणगे यांनी केले. कार्यक्रमाचे नियोजन व सूत्रसंचालन प्रा. अश्विनी पाटील व प्रा. भंडारी यांनी केले. महाविद्यालयाच्या प्रमुख को-ऑर्डिनेटर प्रा. प्रियांका पाटील यांनी गारद देऊन महाराजांना मानवंदना दिली. इतिहास विभाग प्रमुख प्रा. विमल ठाणगे यांचा वाढदिवसही यावेळी साजरा करण्यात आला.शेवटी सर्व मान्यवरांचे व उपस्थितांचे आभार मानून राष्ट्रगीताने कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.
|
Whatsapp आयकॉन दाबून ही बातमी शेअर करा |
Advertising Space













