नमस्कार आमच्या आजचा महाराष्ट्र टॉप टेन मराठी न्यूज चॅनेल मधे आपल स्वागत आहे...येथे तुम्हाला ताज्या घडामोडी व बातम्या मिळतील... बातम्या व जाहिरातींसाठी संपर्क - +91 9029198881 करा. आमचे YouTube चॅनेल, Facebook, Telegram ला सबस्क्राईब/ लाईक करा. , संपादक डॉ.श्री.किशोर पाटील यांना “जीवन गौरव पुरस्कार” जाहीर! – आजचा महाराष्ट्र

संपादक डॉ.श्री.किशोर पाटील यांना “जीवन गौरव पुरस्कार” जाहीर!

प्रतिनिधी

नागपुर :- स्मॉल ॲन्ड मिडीयम न्यूज पेपर असोशियन, सिंधुदुर्ग(Small and Medium Newspapers Association) यांच्या वतीने आयोजित राज्यस्तरीय संपादक एकदिवसीय खुले अधिवेशनात ठाणे जिल्ह्यातील अग्रगण्य मराठी दैनिक स्वराज्य तोरण चे संपादक तथा महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ,मुंबई चे प्रदेशाध्यक्ष(हल्ला विरोधी समिती) मा.डॉ.श्री.किशोर बळीराम पाटील यांना “जीवन गौरव पुरस्कार” प्रदान करण्यात येणार असल्याची अधिकृत घोषणा करण्यात आली आहे. पत्रकारिता क्षेत्रातील दीर्घकालीन, उल्लेखनीय व निष्ठापूर्ण योगदानाची दखल घेत हा सन्मान जाहीर करण्यात आला आहे.पत्रकारितेच्या माध्यमातून समाजातील विविध प्रश्न, घडामोडी

व लोकहिताचे विषय सत्य, निष्पक्ष आणि निःस्वार्थपणे मांडण्याचे कार्य संपादक डॉ.श्री.किशोर पाटील यांनी सातत्याने केले आहे. ग्रामीण भागातील सर्वसामान्यांच्या समस्या प्रशासनापर्यंत पोहोचविणे, सामाजिक प्रश्नांना वाचा फोडणे तसेच जनजागृतीची प्रभावी भूमिका बजावणे या त्यांच्या कार्याची स्मॉल ॲन्ड मिडीयम न्यूज पेपर असोसिएशन सिंधुदुर्ग यांनी राज्यस्तरावर दखल घेतली आहे. त्यांच्या कार्यामुळे समाजात जागरूकता निर्माण झाली असून नव्या पिढीतील पत्रकारांसाठी ते प्रेरणास्थान ठरले आहेत.हा सन्मान सोहळा शनिवार, दि. २१ फेब्रुवारी २०२६ रोजी नगर भवन, हनुमान वॉर्ड, वरोरा, जि. चंद्रपूर येथे मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न होणार आहे. या कार्यक्रमास राज्यभरातील पत्रकार, संपादक व विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित राहणार आहेत.या निवडीबद्दल संस्थेचे राष्ट्रीय अध्यक्ष उत्तमराव वाडकर, राष्ट्रीय सचिव ईश्वरसिंह सेंगर, राष्ट्रीय कार्याध्यक्ष योगेश तुरेराव, राज्य अध्यक्ष संतोष धरमकर (महाराष्ट्र) तसेच राज्य सचिव आशिष घुमे (महाराष्ट्र) यांनी संपादक डॉ.श्री.किशोर पाटील यांचे अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत.त्याचप्रमाणे त्यांचे दैनिक स्वराज्य तोरण परिवाराकडून हार्दिक अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत.

Whatsapp आयकॉन दाबून ही बातमी शेअर करा 

Advertising Space


मुक्त आणि खऱ्या पत्रकारितेसाठी ती कॉर्पोरेट आणि राजकीय नियंत्रणापासून मुक्त असणे आवश्यक आहे. लोक पुढे येऊन सहकार्य करतील तेव्हाच हे शक्य आहे.

आता दान करा

[responsivevoice_button voice="Hindi Female"]