श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान आयोजित धारातीर्थ गडकोट मोहिमेचा भव्य संकल्प
प्रतिनिधी
लोहगड ते भीमगड (राजमाची मार्गे) ऐतिहासिक गडकोट मोहीम २३ ते २६ जानेवारी २०२६ रोजी
रायगड – पाली (ता. सुधागड) :- देव, देश आणि धर्म कार्यासाठी तरुणाईला स्फूर्ती देणारी श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान आयोजित धारातीर्थ गडकोट मोहीम यंदा श्री लोहगड ते श्री भीमगड (राजमाची मार्गे) या ऐतिहासिक मार्गावर माघ शुद्ध पंचमी ते माघ शुद्ध अष्टमी (दि. २३ ते २६ जानेवारी २०२६) या कालावधीतआदरणीय संभाजी भिडे गुरुजी यांच्या दिव्य सानिध्यात संपन्न झाल.बालपणी आरोग्यासाठी जसा लसीकरणाचा डोस आवश्यक असतो, त्याचप्रमाणे देव-देश-धर्माच्या कार्यासाठी धारातीर्थ गडकोट 
मोहिमेचा ‘डोस’ घेणे आवश्यक असल्याचे प्रतिपादन यावेळी करण्यात आले. गडकोट हे केवळ दगडमातीचे ढिगारे नसून, ते भारतमातेच्या कपाळावरील अखंड तेवत असलेले कुंकू आणि हिंदुस्थानची राखीव फौज असल्याचे भावनिक वर्णन यावेळी करण्यात आले.दरम्यान, राजमाची येथे पार पडलेल्या धारातीर्थ गडकोट मोहीम २०२६ अंतर्गत झालेल्या शिवप्रभू दौडीत श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान – रायगड विभागातील मुरूड तालुक्याचे धारकरी समीर नरेश माळी यांनी द्वितीय क्रमांकाचा मान पटकावून रायगडची मान उंचावली.याच पार्श्वभूमीवर रविवार दि. १ फेब्रुवारी २०२६ रोजी पाली येथे श्री बल्लाळेश्वर मंदिराजवळ भंडाराचे आयोजन करण्यात आले होते. या वेळी मोठ्या संख्येने धारकरी उपस्थित होते. मोहिमेदरम्यान अनुभवलेले थरारक प्रसंग, आठवणी आणि शिदोरी स्वरूपात मिळालेले अनुभव यांचे मनोगत व्यक्त करण्यात आले.या कार्यक्रमात धारकरी मयूरदादा नाईक,विजय शिंदे व सौरभदादा जांभेकर यांनी धारातीर्थ गडदुर्ग मोहिमेचे ऐतिहासिक व वैचारिक महत्त्व विशद केले. तसेच कोलाड पंचक्रोशी सकल हिंदू समाज संघटनेचे पुरोहित श्री महेश जंगम स्वामी यांच्या हस्ते समीर माळी यांचा विशेष सत्कार करण्यात आला. प्रथमच मोहिमेत सहभागी झालेल्या धारकऱ्यांचाही यावेळी गौरव करण्यात आला.कार्यक्रमाच्या शेवटी श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानच्या आगामी उपक्रमांबाबत सखोल चर्चा करण्यात आली.इतिहासाची जाणीव, राष्ट्रभक्तीची चेतना आणि गडकोट संवर्धनाचा संकल्प अधिक दृढ करण्याचा निर्धार यावेळी उपस्थितांनी व्यक्त केला.
|
Whatsapp आयकॉन दाबून ही बातमी शेअर करा |
Advertising Space













