नमस्कार आमच्या आजचा महाराष्ट्र टॉप टेन मराठी न्यूज चॅनेल मधे आपल स्वागत आहे...येथे तुम्हाला ताज्या घडामोडी व बातम्या मिळतील... बातम्या व जाहिरातींसाठी संपर्क - +91 9029198881 करा. आमचे YouTube चॅनेल, Facebook, Telegram ला सबस्क्राईब/ लाईक करा. , माणगाव येथे एएम अँबॅकस अँड वेदिक मॅथ्स क्लासचा विद्यार्थी गुणगौरव सोहळा उत्साहात – आजचा महाराष्ट्र

माणगाव येथे एएम अँबॅकस अँड वेदिक मॅथ्स क्लासचा विद्यार्थी गुणगौरव सोहळा उत्साहात

प्रतिनिधी दिलीप करकरे 

रायगड (माणगाव) :- सौ. पुजा वाघमोडे संचालित एएम अँबॅकस अँड वेदिक मॅथ्स क्लासचा विद्यार्थी गुणगौरव कार्यक्रम सोमवार, दि. २ फेब्रुवारी २०२६ रोजी खरे मंगळ कार्यालय, माणगाव येथे उत्साहात संपन्न झाला.या कार्यक्रमास पोलिस निरीक्षक मा. श्री. निवृत्ती बो-हाडे, ज्येष्ठ शैक्षणिक व वैद्यकीय सेवक डॉ. निकम, ज्येष्ठ समाजसेवक मा. श्री. संजय (अण्णा) साबळे, देश व समाजसेवक मा. श्री. निर्मल सिंग रंधवा, शैक्षणिक व सांस्कृतिक कोकण विभागीय प्रमुख डॉ. अजय मोरे, पत्रकार व समाजसेवक मा. श्री. शिवभूषण शिसोंदे, सांस्कृतिक कार्यक्रम संचालिका सौ. अश्विनी समेल, शैक्षणिक व सांस्कृतिक संचालिका सौ. अंकिता मोरे यांच्यासह पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.राज्यस्तरीय अँबॅकस परीक्षेत यश संपादन केलेल्या विद्यार्थ्यांचा मान्यवरांच्या हस्ते सन्मान करण्यात आला.अँबॅकस शिक्षणामुळे विद्यार्थ्यांची बौद्धिक क्षमता, गणितातील रुची व आकलनशक्ती वाढत असल्याचे मत पालकांनी व्यक्त केले.तसेच सौ. पुजा वाघमोडे मॅडम व त्यांचे पती श्री. लाललासाहेब वाघमोडे (पोलीस खात्यात कार्यरत) यांच्या मार्गदर्शनामुळे विद्यार्थ्यांची शैक्षणिक प्रगती लक्षणीय असल्याचे पालकांनी सांगितले.कार्यक्रमाच्या शेवटी प्रमुख पाहुण्यांनी विद्यार्थ्यांना व पालकांना शैक्षणिक जीवनातील संघर्ष, सातत्य आणि यशाचे महत्त्व यावर मोलाचे मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे वातावरण प्रेरणादायी व उत्साही होते.

Whatsapp आयकॉन दाबून ही बातमी शेअर करा 

Advertising Space


मुक्त आणि खऱ्या पत्रकारितेसाठी ती कॉर्पोरेट आणि राजकीय नियंत्रणापासून मुक्त असणे आवश्यक आहे. लोक पुढे येऊन सहकार्य करतील तेव्हाच हे शक्य आहे.

आता दान करा

[responsivevoice_button voice="Hindi Female"]