हि रेकॉर्डब्रेक सभा उद्याच्या विजयाची सुरुवात – ना भरतशेठ गोगावले
प्रतिनिधी पांडुरंग माने
रायगड (गोरेगांव) :- राजमाता मैदानावर झालेली सभा शिवसेनेसाठी नेहमीच लकी ठरते . आजची ही सभा शिवसेनेच्या उद्याच्या विजयाची नांदी आहे. असा विश्वास ना भरतशेठ गोगावले यांनी गोरेगांव येथे व्यक्त केला .गोरेगांव येथील शिवसेना उमेदवारांच्या झालेल्या प्रचार सभेत ना भरतशेठ गोगावले बोलत होते या सभेस शिवसेनेचे जिल्हा परिषद उमेदवार दिनेश हरवंडकर , रवी टेंबे आणि सर्व पंचायत समिती उमेदवारांह युवासेनेचे कोअर कमिटी सदस्य विकास गोगावले, जिल्हा संपर्क प्रमुख अरुण चाळके जिल्हा प्रमुख प्रमोद घोसाळकर ; महिला जिल्हा संघटक सौ . निलिमा घोसाळकर , माजी जि. प सदस्य सौ. अमृता हरवंडकर , रमेश मोरे , शिवसेना नेते प्रकाश हरवंडकर उपस्थित होते .
विधानसभा निवडणुकीत रायगडमधील सर्वाचिक मताधिक्य मला लोणेरे व गोरेगांव जि. प मतदार संघात मितळाल्याचे ना . गोगावले यांनी यावेळी स्पष्ट करताना हाच टेम्पो कायम ठेवावा असे आवाहन केले ते म्हणाले की, यापुढे रायगडमधे शिवसेना राष्ट्रवादीशी युती करणार नाही आणि जिल्हा परिषद व पंचायत समितीवर शिवसेनेचा एक हाती भगवा फडकवेल असा विश्वास व्यक्त केला.यावेळी विकास गोगावले यांनी मतदारांचे आभार व्यक्त करताना आजची ही रेकॉर्ड ब्रेक सभ ही ९ तारखेच्या विजयाची नांदी ठरेल असा विश्वास व्यक्त केला . यावेळी त्यांनी ना . भरतशेठ यांनी या जिल्ह्यात तसेच जि.प मतदार संघात केलेली विकासकामे अधोरेखित केली .प्रमोद घोसाळकर अरुण चाळके, निलिमा घोसाळकर ‘ स्वाती करकरे राम टेंबे यांनीही यावेळी सेनेच्या उमेदवारांना भरघोस मतदान करण्याचे आवाहन केले .राजमाता मैदानावरील सभा शिवसेनेला नेहमीच विजयी करीत आली आहे असे सांगून ना भरतशेठ गोगावले यांनी शिवसेनेनेने गेल्या लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसला मतदान केल्याबद्दल खंत व्यक्त केली आणि यापुढे रायगडच्या राजकारणात राष्ट्रवादी काँग्रेससोबत कधीही युती करणार नाही, असा ठाम निर्धार व्यक्त केला.पक्षाचे आदेश मानून आपली उमेदवारी जाहीर न केल्याने विकास गोगावले यांनी अनिकेत घोसाळकर,विकास गायकवाड,राम टेंबे यांना धन्यवाद देत आजची सभा ही विरोधकांना एक मेसेज असल्याचे सुतोवाच केले . या निवडणुकीत शिवसेनेचे उमेदवार निवडून आणून शिवसेनेचा भगवा फडकवेल असा ठाम विश्वास व्यक केला . निवडणुकीत ना गोगावले यांच्या पुढाकाराने महाड पंचायात समितीचा उमेदवार बिनविरोध निवडून येवू शकतो हे मतदारांनी दाखवून दिले असल्याचे सांगून विकास गोगावले यांनी मतदारांना धन्यवाद दिले .आमदार भरतशेठ गोगवले यांनी गोरेगाव जिल्हा परिषद मतदारसंघ आणि निजामपूर भागात मोठ्या प्रमाणावर निधी देऊन विकासकामे केल्याचे भाषणात विकास गोगावले ची नमूद केले आहे.निवडणुकीचे आवाहन जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकांमध्ये शिवसेनेच्या ‘धनुष्यबाण’ चिन्हासमोरील बटण दाबून उमेदवारांना प्रचंड मताधिक्याने निवडून आणण्याचे आवाहन विकास गोगावले यांनी केले. पक्षप्रवेश आणि एकजूट: राष्ट्रवादीचे च्या राम टेंबे माजी सभापती शकुंतला टेंबे व समर्थकांनी शिवसेनेत प्रवेश केल्याबद्दल त्यांचे स्वागत करण्यात आले. तसेच, पाच पक्षांविरुद्ध शिवसेना एकटी लढत असून सर्व कार्यकर्त्यांनी आणि विविध आघाड्यांनी (युवा सेना, महिला आघाडी) एकत्र येऊन काम करावे, असे ना गोगावले यांनी सांगितले . ते म्हणाले की, एखाद्या लाख रुपयांसाठी विरोधकांकडे हात पसरू नका मी तुमच्या मतदार संघात कोटयवधीची विकासकामे केली असून पाच वर्षातून एकदा तुमच्याकडून मतरूपी आशीर्वादची अपेक्षा करतो ही माझी अपेक्षा ही माझ्यावर तुम्ही केलेले उपकार समजून कामे होतच राहतील त्यासाठी विरोधकांकडे लाचार होवू नका असे आवाहन ना गोगावले यांनी मतदारांना केले भविष्यातील संकल्प: “भरतशेठच्या पावलावर पाऊल ठेवून” विकास गोगावले भविष्यात अधिक चांगले काम करतील, असा विश्वास या वेळी व्यक्त करण्यात आला. तसेच कार्यकर्त्यांनी वा अन्य कुणी चुकीचे काम केले तर याद राखा अशी सक्त ताकीदही विकास गोगावले यांनी यावेळी दिली.यावेळी अरुण चाळके प्रमोद घोसाळकर निलिमा घोसाळकर राम टेंबे यांनी दिनेश हरवंडकर रवी टेंबे स्वाती करकरे यां तिन्हीही शिवसेना उमेदवाराना निवडून देण्याचे आवाहन केले.
|
Whatsapp आयकॉन दाबून ही बातमी शेअर करा |
Advertising Space













