खेड तालुका कोकण रहिवासी मंचचा स्तुत्य उपक्रम; ६०० विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप
प्रतिनिधी राजेंद्र दळवी
रत्नागिरी (खेड) :- खेड तालुका कोकण रहिवासी मंच, दिवा शहर यांच्या वतीने “माझी शाळा, माझी जबाबदारी” या सामाजिक जाणिवेतून एक स्तुत्य शैक्षणिक उपक्रम राबविण्यात आला. शनिवार, दिनांक १७ जानेवारी रोजी कुळवंडी, ऐनवरे, गुणदे, शेल्डी या गावांमध्ये तर रविवार, दिनांक १८ जानेवारी रोजी हुतात्मा अनंत लक्ष्मण कान्हेरे विद्यालय, अंजनी (आयनी) तसेच कोरेगाव गावातील सर्व शाळांमध्ये हा उपक्रम यशस्वीरीत्या पार पडला.या उपक्रमांतर्गत जवळपास साडेपाचशे ते सहाशे विद्यार्थ्यांना शालेय दप्तर, पेन, पेन्सिल, वह्या व आवश्यक शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक गरजांकडे लक्ष देत 
त्यांना प्रोत्साहन देण्याचा हा उपक्रम उपस्थितांकडून विशेष प्रशंसेचा विषय ठरला.संस्थेला गावापर्यंत पोहोचून सेवा करण्याची संधी दिल्याबद्दल तसेच या नेत्रदीपक कार्याच्या पोचपावतीस्वरूप कुळवंडी गावातील पदाधिकारी श्री. संतोष दादा खोत निकम, विशाल निकम, सुधीर चोरगे, गुणदे गावातील शिक्षणप्रेमी कृष्णकांत जंगम गुरुजी, हुतात्मा अनंत लक्ष्मण कान्हेरे विद्यालय, आयनी येथील सुपुत्र शाहीर रत्नाकर महाकाळ बुवा, तसेच कोरेगाव गावातील विशाल विठोबा देवळे व आशिष बुरटे यांचा संस्थेच्या वतीने सन्मानचिन्ह देऊन विशेष गौरव करण्यात आला.या कार्यक्रमास संस्थेचे अध्यक्ष श्री. सतीश सहदेव निकम, सचिव श्री. निलेश शांताराम पाटणे, खजिनदार श्री. संदेश नथुराम कदम, कार्याध्यक्ष श्री. संतोष दादाखोत निकम, प्रवक्ता श्री. प्रवीण केशव उतेकर, उपाध्यक्ष श्री. दीपक सदानंद उतेकर, सल्लागार ओंकार चाळके, मंगेश शेलार, शरद शिबे, विजय गोगावले, सहसचिव श्री. विशाल विठोबा देवळे, सहखजिनदार श्री. हरेश लाड, रोशन आंब्रे, सहकार्याध्यक्ष श्री. प्रवीण कदम, सह संपर्कप्रमुख श्री. अशोक कदम, कार्यालय प्रमुख श्री. सुधीर निकम, श्री. दयानंद पडवळ यांच्यासह कमिटी सदस्य श्री. रुपेश करजवकर, अमोल जाधव, राकेश कदम, विशाल निकम, सुधीर चोरगे, आशिष बुरटे, ज्ञानेश्वर कदम, दिनेश पास्ते, कु. सुयश निकम, कल्पेश करजवकर, दर्शन शेलार आदी मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.खेड तालुक्यातील शैक्षणिक विकासासाठी सातत्याने कार्यरत असलेल्या खेड तालुका कोकण रहिवासी मंच, दिवा शहर यांच्या या उपक्रमामुळे सामाजिक बांधिलकीचा आदर्श निर्माण झाला असून भविष्यातही असे उपक्रम राबविण्याचा मानस संस्थेच्या वतीने व्यक्त करण्यात आला.
|
Whatsapp आयकॉन दाबून ही बातमी शेअर करा |
Advertising Space













