नमस्कार आमच्या आजचा महाराष्ट्र टॉप टेन मराठी न्यूज चॅनेल मधे आपल स्वागत आहे...येथे तुम्हाला ताज्या घडामोडी व बातम्या मिळतील... बातम्या व जाहिरातींसाठी संपर्क - +91 9029198881 करा. आमचे YouTube चॅनेल, Facebook, Telegram ला सबस्क्राईब/ लाईक करा. , मांगवली येथे श्री सोमजाई मातेचा १३ वा उत्सव सोहळा भक्तिभावात संपन्न – आजचा महाराष्ट्र

मांगवली येथे श्री सोमजाई मातेचा १३ वा उत्सव सोहळा भक्तिभावात संपन्न

प्रतिनिधी महेश स्वामी 

रायगड ( रोहा – कोलाड ) : श्री क्षेत्र मांगवली, ता. माणगांव येथे जागृत देवस्थान असलेल्या श्री सोमजाई मातेचा १३ वा वार्षिक उत्सव सोहळा रविवार, दि. ११ जानेवारी २०२६ रोजी मोठ्या भक्तिभावात व उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला.या उत्सवासाठी परिसरातील तसेच मुंबई, माणगांव, रोहा आदी भागांतून असंख्य देवीभक्तांनी उपस्थिती लावून श्री सोमजाई मातेच्या दर्शनाचा व महाप्रसादाचा लाभ घेतला. सकाळी श्री सोमजाई देवीच्या अभिषेकाने उत्सवाची सुरुवात झाली. त्यानंतर श्री सत्यनारायणाची महापूजा भक्तिभावाने पार पडली. दुपारी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते.संध्याकाळी श्री सोमजाई ग्रामस्थ भजन मंडळ, मांगवली यांच्या भजन कार्यक्रमाने

परिसर भक्तिरसात न्हाऊन निघाला. उत्सवाच्या निमित्ताने दि. १० जानेवारी २०२६ रोजी मोफत आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिरास ग्रामस्थांनी चांगला प्रतिसाद दिला.दुपारी जनजागृती भारूड मंडळ, आळंदी देवाची यांचे विनोदी शैलीतून समाजप्रबोधन करणारे किर्तन सादर करण्यात आले. गोविंद महाराज गायकवाड यांच्या भारुडाने उपस्थितांची मने जिंकली. रात्री ठिक ९ वाजता नाचाचे जंगी सामने आयोजित करण्यात आले असून, गोविंद महाराज गायकवाड व गोविद महाराज गायकवाड यांच्या सादरीकरणास प्रेक्षकांनी मोठा प्रतिसाद दिला.भानुदास घराण्यातील शक्तिवाल्या तसेच ताडदेव घराण्यातील तुरेवाले यांच्या पारंपरिक कलेच्या सादरीकरणाने उत्सवात रंगत भरली. शाहिर सौ. वृदाली दळवी (महाडिक), अक्षय चेतन, शाहिर योगेश जाधव व कवी मंगेश बिरगावले यांच्या सहभागामुळे कार्यक्रम अधिक आकर्षक ठरला.या उत्सवाचे आयोजन श्री. विजय काशिराम पाखुर्डे (मांगवली) तसेच श्री सोमजाई मातेचे भक्त, मांगवली ग्रामस्थ, महिला मंडळ व मुंबईकर मंडळ यांच्या वतीने करण्यात आले होते. नियोजन व व्यवस्थापनाची जबाबदारी सरपंच श्री. संतोष खडतर, उपसरपंच श्री. मंगेश पवार यांच्यासह सर्व ग्रामस्थांनी यशस्वीरीत्या पार पाडली. तसेच ताडदेव घराण्यातील शाहीर, कवी, उत्तम ढोलकी वादक श्री मंगेश मालू बिरगावले यांनी ३५ वर्ष वीर हनुमान युवक मंडळ तिसे रोहा संलग्न रायगडचा राजा नाच मंडळ तिसे यांच्यामध्ये उत्तम कविता तसेच ढोलकी वादक केल्याची पोचपावती म्हणून मागवली येथे शाल श्रीपल व सन्मान चिन्ह देऊन सन्मानित करण्यात आले तसेच शाहीर योगेश जाधव नाच मंडळ नावे यांनी शाहिरी माध्यमातून समाजप्रबोधनाचे गेली पंधरा वर्षे सेवा करत आहेत त्यामुळे जनाई सन्मानित करण्यात आले व शाहीर वृंदाली दळवी महाडिक यांना सुद्धा शाल श्रीपल सन्मानचिन्ह देऊन सन्मानित करण्यात आले तसेच विविध क्षेत्रात कार्य करत असणाऱ्या लोकांनाही सन्मानित करण्यात आले.संपूर्ण उत्सव शांततेत, शिस्तबद्ध व भक्तिमय वातावरणात संपन्न झाल.

Whatsapp आयकॉन दाबून ही बातमी शेअर करा 

Advertising Space


मुक्त आणि खऱ्या पत्रकारितेसाठी ती कॉर्पोरेट आणि राजकीय नियंत्रणापासून मुक्त असणे आवश्यक आहे. लोक पुढे येऊन सहकार्य करतील तेव्हाच हे शक्य आहे.

आता दान करा

[responsivevoice_button voice="Hindi Female"]