माणगाव उपजिल्हा रुग्णालयात मोतीबिंदू रुग्णांना ५० गॉगलचे मोफत वाटप
प्रतिनिधी दिलीप करकरे
रायगड (माणगाव):- सौ.संजना संतोष खाडे यांच्या वाढदिवसानिमित्त सामाजिक बांधिलकी जपत माणगाव उपजिल्हा रुग्णालयात मोतीबिंदू शस्त्रक्रिया झालेल्या रुग्णांसाठी ५० गॉगलचे मोफत वाटप करण्यात आले.डोळ्यांच्या शस्त्रक्रियेनंतर रुग्णांच्या दृष्टीसंरक्षणासाठी गॉगल अत्यंत आवश्यक असतात. ही गरज ओळखून खाडे परिवाराच्या वतीने हा उपक्रम राबविण्यात आला.या कार्यक्रमाला उपजिल्हा रुग्णालयातील वैद्यकीय अधिकारी, डॉक्टर, परिचारिका तसेच इतर कर्मचारी वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होता.रुग्णालय प्रशासनाने या उपक्रमाचे स्वागत करत अशा सामाजिक उपक्रमांमुळे गरजू रुग्णांना मोठा आधार मिळतो, असे मत व्यक्त केले. अनेक रुग्णांनी गॉगल मिळाल्याबद्दल समाधान 
व्यक्त करत खाडे परिवाराचे आभार मानले.राज खाडे, जय खाडे व संपूर्ण खाडे परिवार यांच्या पुढाकारातून ही भेट देण्यात आली. रुग्णसेवक, समाजसेवक, मानवसेवक व समाजरत्न म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या परिवाराने वाढदिवसाचा आनंद सामाजिक कार्यातून साजरा करत समाजासमोर एक सकारात्मक आदर्श ठेवला आहे.वाढदिवस केवळ औपचारिक साजरा न करता तो समाजोपयोगी उपक्रमांसाठी समर्पित केल्याने या कार्यक्रमाची सर्वत्र चर्चा होत असून, खाडे परिवाराच्या या उपक्रमाचे नागरिक, रुग्ण व रुग्णालय प्रशासनाकडून मनःपूर्वक कौतुक होत आहे.
|
Whatsapp आयकॉन दाबून ही बातमी शेअर करा |
Advertising Space













