नमस्कार आमच्या आजचा महाराष्ट्र टॉप टेन मराठी न्यूज चॅनेल मधे आपल स्वागत आहे...येथे तुम्हाला ताज्या घडामोडी व बातम्या मिळतील... बातम्या व जाहिरातींसाठी संपर्क - +91 9029198881 करा. आमचे YouTube चॅनेल, Facebook, Telegram ला सबस्क्राईब/ लाईक करा. , किल्ले रायगडावर शिव संस्कार रायगडची स्वच्छता मोहीम – आजचा महाराष्ट्र

किल्ले रायगडावर शिव संस्कार रायगडची स्वच्छता मोहीम

प्रतिनिधी दिलीप करकरे 

रायगड(माणगाव):- छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्याची राजधानी असलेल्या ऐतिहासिक किल्ले रायगडावर शिव संस्कार रायगड (शिवबाची युवा पिढी) यांच्या पुढाकाराने रविवार, दिनांक ११ जानेवारी रोजी पायरी मार्गावर भव्य स्वच्छता मोहीम राबविण्यात आली.या मोहिमेत मोठ्या संख्येने शिवभक्त युवक सहभागी झाले होते. पायरी मार्गावर पडलेल्या प्लास्टिक पिशव्या, पाण्याच्या

बाटल्या, खाद्यपदार्थांचे रॅपर व इतर कचरा गोळा करून संपूर्ण परिसर स्वच्छ करण्यात आला. पर्यटकांकडून होणाऱ्या प्रदूषणामुळे गडाचे पावित्र्य बिघडत असल्याची जाणीव ठेवत युवकांनी अत्यंत शिस्तबद्ध पद्धतीने ही मोहीम पार पाडली.स्वच्छता मोहिमेची सुरुवात पहिल्या पायरीचे नतमस्तक दर्शन घेऊन करण्यात आली. शिवरायांच्या पावन चरणस्पर्शाने पवित्र झालेल्या या ऐतिहासिक भूमीचे पावित्र्य जपण्याचा संकल्प यावेळी उपस्थितांनी केला.यावेळी बोलताना विकास आग्रे यांनी सांगितले की, “गड-किल्ले हे आपल्या इतिहासाचे साक्षीदार आहेत. त्यांची स्वच्छता व जतन करणे ही आपली सर्वांची जबाबदारी आहे. युवा पिढीने या कार्यात पुढाकार घेतला हे निश्चितच अभिमानास्पद आहे.या उपक्रमात शिव संस्कार रायगड (शिवबाची युवा पिढी) परिवारातील सर्व शिवभक्त मोठ्या उत्साहाने सहभागी झाले होते. या मोहिमेमुळे युवकांमध्ये सामाजिक बांधिलकी व ऐतिहासिक वारशाविषयी जागरूकता वाढली असून सर्व स्तरातून या उपक्रमाचे कौतुक होत आहे.

Whatsapp आयकॉन दाबून ही बातमी शेअर करा 

Advertising Space


मुक्त आणि खऱ्या पत्रकारितेसाठी ती कॉर्पोरेट आणि राजकीय नियंत्रणापासून मुक्त असणे आवश्यक आहे. लोक पुढे येऊन सहकार्य करतील तेव्हाच हे शक्य आहे.

आता दान करा

[responsivevoice_button voice="Hindi Female"]