नमस्कार आमच्या आजचा महाराष्ट्र टॉप टेन मराठी न्यूज चॅनेल मधे आपल स्वागत आहे...येथे तुम्हाला ताज्या घडामोडी व बातम्या मिळतील... बातम्या व जाहिरातींसाठी संपर्क - +91 9029198881 करा. आमचे YouTube चॅनेल, Facebook, Telegram ला सबस्क्राईब/ लाईक करा. , राज्याचे मंत्री भरतशेठ गोगावले यांनी मध्यरात्री रस्त्यावरील अपघातग्रस्त तरुणांना दिला मदतीचा हात ! अपघातग्रस्ताना उपचारासाठी स्वतः केले रुग्णालयामध्ये दाखल – आजचा महाराष्ट्र

राज्याचे मंत्री भरतशेठ गोगावले यांनी मध्यरात्री रस्त्यावरील अपघातग्रस्त तरुणांना दिला मदतीचा हात ! अपघातग्रस्ताना उपचारासाठी स्वतः केले रुग्णालयामध्ये दाखल

प्रतिनिधी पांडुरंग माने

रायगड (माणगाव) :- नामदार श्री. भरतशेठ गोगावले यांचा ताफा मुंबई वरून महाड कडे येत असताना निजामपूर जवळील कांदळगाव फाटा येथे काल मध्यरात्री १.०० च्या सुमारास अपघातग्रस्त दोन तरुण गंभीर जखमी अवस्थेत रस्त्यावर पडले होते. मंत्री भरतशेठ गोगावले यांनी आपल्या ताफ्यातील गाडीतून त्या अपघातग्रस्त तरुणांना उपचारासाठी माणगांव उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले. मंत्री भरतशेठ गोगावले यांनी स्वतः माणगांव उपजिल्हा रुग्णालयात थांबून अपघातग्रस्त तरुणांवर त्वरित प्राथमिक उपचार करण्यास डॉक्टरांना सांगितले.तातडीने प्राथमिक उपचार मिळाल्यामुळे अपघातग्रस्त तरुणांच्या जीवितास असलेला धोका टळला गेला. एवढेच नाही तर त्या अपघातग्रस्त तरुणांच्या काळजीपोटी त्यांचे सिटीस्कॅन रिपोर्ट्स, तब्बेतीची पहाटेपर्यंत चौकशी करत, फोनद्वारे युवासेना जिल्हाप्रमुख विपुल उभारे यांना अपघातग्रस्ताना सर्वतोपरी सहकार्य करण्याच्या सूचना देत होते.रात्री-अपरात्री, संकटसमयी धावून जाणारे आमदार अशी मंत्री भरतशेठ गोगावले यांची ख्याती संपुर्ण महाराष्ट्रामध्ये आहे. राज्याचे मंत्री झाल्यानंतर व्यस्त कार्यक्रमामधून सुद्धा त्यांच्या कार्यपद्धतीमध्ये कोणताही बदल झाला नाही नसून, निःस्वार्थ वृत्तीने जनतेच्या सेवेसाठी २४x७ उपलब्ध असणारा नेता अशी त्यांची ओळख आजही कायम आहे.नुकत्याच झालेल्या पूरपरिस्थितीमध्ये पुरग्रस्त नागरिकांना केलेली मदत असेल, इंदापूर येथील दुकानाला लागलेल्या आगीमध्ये रात्री आग विझविण्यासाठी व दुकानदाराना केलेली आर्थिक मदत असेल, मध्यरात्री अपघातग्रस्ताना दिलेला मदतीचा हात असेल, लोकप्रतिनिधी, आमदार आणि मंत्री असावा तर नामदार भरतशेठ गोगावले यांच्यासारखा‘जनतेची तळहाताच्या फोडाप्रमाणे काळजी घेणारा असावा’ अश्या प्रतिक्रिया जनसामान्य नागरिकांमधून उमटत आहेत.मंत्री भरतशेठ गोगावले यांच्यावर सर्वसामान्य नागरिक जीवापाड प्रेम का करतात याची अनुभूती कालच्या प्रसंगातून पुन्हा एकदा अनुभवायला मिळाली.यावेळी युवासेना जिल्हाप्रमुख विपुल उभारे, माणगाव सहाय्यक पोलीस निरीक्षक नरेंद्र बेलदार, स्वीय सहाय्यक सुशांत जगताप, भिकाजी मांढरे, शंकर शिंदे, सतीश निकम, युवासेना तालुका संपर्कप्रमुख संतोष पोळेकर, सचिन भोईर,अनुज शिंदे, स्वप्नील सावंत, श्रेयस सुर्वे,तुषार गायकवाड, उपजिल्हा रुग्णालयाचे डॉक्टर्स, कर्मचारी उपस्थित होते.

Whatsapp आयकॉन दाबून ही बातमी शेअर करा 

Advertising Space


मुक्त आणि खऱ्या पत्रकारितेसाठी ती कॉर्पोरेट आणि राजकीय नियंत्रणापासून मुक्त असणे आवश्यक आहे. लोक पुढे येऊन सहकार्य करतील तेव्हाच हे शक्य आहे.

आता दान करा

[responsivevoice_button voice="Hindi Female"]