हात गेले, पण हिम्मत हरली नाही!” Mpsc उत्तीर्ण
प्रतिनिधी सतिश वि.पाटील
मुंबई :- नांदेडचे सुपुत्र वैभव पईतवार यांनी आपल्या जिद्दीच्या आणि आत्मविश्वासाच्या बळावर अशक्य वाटणारी गोष्ट शक्य करून दाखवली आहे. ज्यांच्या दोन्ही हातांनी कधी स्पर्धा परीक्षा लिहिण्याची कल्पनाही करता येत नव्हती, त्या वैभवने दोन्ही नसतानाही MPSC सारखी कठीण परीक्षा उत्तीर्ण केली आणि आता मुंबईमध्ये महसूल सहाय्यक पदावर त्यांची नेमणूक झाली 
आहे. त्यांचा हा संघर्ष आणि यश केवळ त्यांच्यापुरतं मर्यादित नाही, तर तो प्रत्येकासाठी प्रेरणादायी आहे, ज्यांनी कधी ना कधी आयुष्यात हार मानली आहे. वैभवने सिद्ध करून दाखवलं की संकटं कितीही मोठी असली, तरी मनात जिद्द आणि धैर्य असेल, तर कोणतीही गोष्ट अशक्य नाही.इलेट्रीक शाॅक लागून दोन्ही हात गमावले होते , कोरोना काळात काही काही वेळ अभ्यास करता आला नाही,दहावीत असताना वडील वारले आणि घरची जबाबदारी वैभव आली या सर्व परिस्थितीत न डगमता त्यांने मनापासून जिद्द व चिकाटीने यश संपादन केले. त्यांच्या यशाच्या या प्रवासात त्यांनी दाखवलेला आत्मबळ, चिकाटी आणि सकारात्मक दृष्टिकोन खरंच कौतुकास्पद आहे.नांदेडचा हा मुलगा आज महाराष्ट्राच्या नव्या उमेदवारांसाठी प्रेरणेचा स्रोत ठरला आहे!सर्व स्थरांतून आज कौतुक होत आहे .खरच मनापासून अभिनंदन.
|
Whatsapp आयकॉन दाबून ही बातमी शेअर करा |
Advertising Space













