नमस्कार आमच्या आजचा महाराष्ट्र टॉप टेन मराठी न्यूज चॅनेल मधे आपल स्वागत आहे...येथे तुम्हाला ताज्या घडामोडी व बातम्या मिळतील... बातम्या व जाहिरातींसाठी संपर्क - +91 9029198881 करा. आमचे YouTube चॅनेल, Facebook, Telegram ला सबस्क्राईब/ लाईक करा. , ग्रामपंचायत सरपंच आरक्षण २०२५-२०३० ता.खेड जि.रत्नागिरी. – आजचा महाराष्ट्र

ग्रामपंचायत सरपंच आरक्षण २०२५-२०३० ता.खेड जि.रत्नागिरी.

प्रतिनिधी राजेंद्र दळवी 

रत्नागिरी (खेड) :- सोमवार दिनांक १४ जुलै २०२५ रोजी खेड जि.रत्नागिरी तालुक्यातील एकुण ११४ ग्रामपंचायतीच्या आगामी सन २०२५ – २०३० या कालावधी साठी सरपंच पदाचे आरक्षण काढणे कामी काळकाई मंदिर सभागृह,भरणे नाका येथे जाहीर बैठक (आरक्षण सोडत) आयोजित करण्यात आली होती.यावेळी तालुक्यातील सर्वच राजकीय पक्षांचे प्रमुख पदाधिकारी,आजी-माजी सरपंच, ग्रामपंचायत सदस्य व प्रतिष्ठित नागरिक मोठ्या प्रमाणात

उपस्थित होते.यावेळी मा.सुधीर सोनवणे, तहसीलदार खेड,मा.लक्ष्मिकांत सिनकर, निवासी नायब तहसीलदार,खेड मा.अमित इंगळे, निवडणूक नायब तहसीलदार, खेड मा.उमाकांत देशमुख, मंडळ अधिकारी,भरणे मा.पांडुरंग डोके,अव्वल महसूल सहाय्यक, खेड मा.विशाल चौगले, ग्राम महसुल अधिकारी,भरणे,मा.गणेश सांगळे,संगणक परिचालक,भरणे मंडळातील सर्व कोतवाल / शिपाई उपस्थित होते.निवडणूक आयोगाच्या सुचनेनुसार खेळीमेळीच्या वातावरणात संपूर्ण तालुक्यातील सरपंच पदाचे आरक्षण सर्वांसमक्ष निश्चित करण्यात आले.याबाबत जनतेतुन समाधान व्यक्त केले जात आहे.

Whatsapp आयकॉन दाबून ही बातमी शेअर करा 

Advertising Space


मुक्त आणि खऱ्या पत्रकारितेसाठी ती कॉर्पोरेट आणि राजकीय नियंत्रणापासून मुक्त असणे आवश्यक आहे. लोक पुढे येऊन सहकार्य करतील तेव्हाच हे शक्य आहे.

आता दान करा

[responsivevoice_button voice="Hindi Female"]