नमस्कार आमच्या आजचा महाराष्ट्र टॉप टेन मराठी न्यूज चॅनेल मधे आपल स्वागत आहे...येथे तुम्हाला ताज्या घडामोडी व बातम्या मिळतील... बातम्या व जाहिरातींसाठी संपर्क - +91 9029198881 करा. आमचे YouTube चॅनेल, Facebook, Telegram ला सबस्क्राईब/ लाईक करा. , कुटुंबिनी उरण महिला संघ तर्फे मंगळागौर कार्यक्रमाचे आयोजन – आजचा महाराष्ट्र

कुटुंबिनी उरण महिला संघ तर्फे मंगळागौर कार्यक्रमाचे आयोजन

प्रतिनिधी विठ्ठल ममताबादे 

मोठया संख्येने सहभागी होण्याचे महिलांना आवाहन

रायगड (उरण) :- दि.१३ समस्त महिलांना आत्मनिर्भर बनविण्याच्या दृष्टीने तसेच महिलांच्या विविध कला गुणांना, कला कौशल्यांना वाव देण्याच्या दृष्टीकोणातून, भारतीय संस्कृतीचा अमूल्य ठेवा जपला जावा या हेतूने कुटुंबिनी उरण महिला संघ या सामाजिक संस्थेतर्फे शनिवार दिनांक २ ऑगस्ट २०२५ रोजी दुपारी ३ वाजता शेप्स जिमखाना टेरेस उरण येथे मंगळागौर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमात सहभागी झालेल्या महिलांमधून सर्वोत्कृष्ट रंगभूषा,सर्वोत्कृष्ट उखाणा, सर्वोत्कृष्ट लक्षवेधी चेहरा,सर्वोत्कृष्ट नृत्य,सर्वोत्कृष्ट वेशभूषा,सर्वोत्कृष्ट शृंगार,सर्वोत्कृष्ट शृंगार व वेशभूषा (कुमारिका )महिला निवडण्यात येणार आहेत.

त्यांना विविध पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे. विजयी स्पर्धेकांना रोख रक्कम व आकर्षक बक्षीसे दिली जाणार आहेत. दरवर्षी या मंगळागौर कार्यक्रमात महिलांचा मोठया प्रमाणात सहभाग असतो. दरवर्षी या कार्यक्रमाला महिलांचा भरभरून प्रतिसाद मिळत असतो. यंदाचे मंगळागौर कार्यक्रमाचे हे ३ रे वर्ष आहे. दरवर्षी प्रमाणे याही वर्षी महिला भगिनींनी मंगळागौर कार्यक्रमात मोठया संख्येने सहभागी व्हावे, नाव नोंदणी साठी श्लोक पाटील – ९००४११३८५८, आरती ढोले -९९६७९५५९३३ यांच्याशी संपर्क साधावे असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.

Whatsapp आयकॉन दाबून ही बातमी शेअर करा 

Advertising Space


मुक्त आणि खऱ्या पत्रकारितेसाठी ती कॉर्पोरेट आणि राजकीय नियंत्रणापासून मुक्त असणे आवश्यक आहे. लोक पुढे येऊन सहकार्य करतील तेव्हाच हे शक्य आहे.

आता दान करा

[responsivevoice_button voice="Hindi Female"]