मालाड हेल्पलाइन फाउंडेशन (एनजीओ) कडून श्रीमाळी गोडवाड ब्राह्मण समाजातील विद्यार्थ्यांना सन्मानित
प्रतिनिधी ललित दवे
मुंबई :- मालाड हेल्पलाइन फाउंडेशन एनजीओ कडून आयोजित कार्यक्रमात श्री गोडवाड श्रीमाळी ब्राह्मण समाजातील १० वी आणि १२ वी चांगल्या टक्केवारीने उत्तीर्ण झालेल्या हुशार विद्यार्थ्यांचा सन्मान करण्यात आला. एसएससी, एचएससी, सीबीएसई मध्ये ७५% पेक्षा जास्त गुण मिळवणाऱ्या २२ विद्यार्थ्यांना सन्मानित करण्यात आले. ही संस्था २०१५ पासून सर्व समाज, रुग्णालये, शिक्षण, अपंगांसाठी अशा सामाजिक कार्यासाठी काम करत आहे. संस्थेचे अधिकारी मनोहर ओझा, पन्ना ओझा, रुचिता सोलंकी, अंकित सोलंकी, जय यांनी सर्व विद्यार्थ्यांना प्रमाणपत्रे आणि कॉलेज 
बॅग देऊन सन्मानित केले. सन्मानित झालेल्या विद्यार्थ्यांमध्ये बारावीचा विद्यार्थी वेदांग जी. ओझा निधी दवे ललित दवे रिया बिरेन कुमार जी ओझा देवांग व्यास खुशी दवे यश लोकेश ओझा निशांत सुरेश कुमार ठाकूर जानवी शैलेंद्र जोशी. एसएससीच्या विद्यार्थिनी हर्षिका ओझा जिनल दवे दिया शर्मा नित्या त्रिवेदी धनिष्टा परेश व्यास धैर्य अतुल बोहरा भव्य वैभव ओझा भारत महेंद्रकुमार व्यास समर्थ ठाकूर सिमरन ठाकूर ग्रीष्मा श्रीमाळी पायल पप्पू त्रिवेदी मनन शर्मा आदित्री महावीर दवे यांनी सर्व विद्यार्थी आणि त्यांच्या पालकांना विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या.
|
Whatsapp आयकॉन दाबून ही बातमी शेअर करा |
Advertising Space













