नमस्कार आमच्या आजचा महाराष्ट्र टॉप टेन मराठी न्यूज चॅनेल मधे आपल स्वागत आहे...येथे तुम्हाला ताज्या घडामोडी व बातम्या मिळतील... बातम्या व जाहिरातींसाठी संपर्क - +91 9029198881 करा. आमचे YouTube चॅनेल, Facebook, Telegram ला सबस्क्राईब/ लाईक करा. , श्री शिवशंभू युवा सामाजिक संस्थेतर्फे वृक्षारोपण व शालेय वस्तू वाटप कार्यक्रम उत्साहात पार – आजचा महाराष्ट्र

श्री शिवशंभू युवा सामाजिक संस्थेतर्फे वृक्षारोपण व शालेय वस्तू वाटप कार्यक्रम उत्साहात पार

प्रतिनिधी

रायगड (तळा) :- श्री शिवशंभू युवा सामाजिक संस्था, कळसांबडे (नोंदणी क्र. महा-२६९/२१) यांच्या वतीने दिनांक २९ जून २०२५ रोजी पर्यावरण संरक्षण आणि विद्यार्थ्यांना शैक्षणिक मदतीचा संदेश देणारा दुहेरी कार्यक्रम आयोजित करण्यात आला.सकाळी ९ वाजता संस्थेचे पदाधिकारी, सदस्य आणि ग्रामस्थ यांच्या उपस्थितीत वृक्षारोपण करण्यात आले. यानंतर सकाळी १०.३० वाजता गावातील अंगणवाडी ते १५ वीपर्यंतच्या विद्यार्थ्यांना शालेय वस्तूंचे (पुस्तके, वह्या, लेखन साहित्य) वाटप करण्यात आले.या उपक्रमात संस्थेचे

सर्व सभासद, गावातील मान्यवर ग्रामस्थ, पालक तसेच विद्यार्थी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. कार्यक्रमात पर्यावरण संवर्धनाबाबत जनजागृती करण्यात आली तसेच विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी प्रोत्साहन देण्यात आले.संस्थेच्या या सामाजिक उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत असून, भविष्यातही असेच उपक्रम राबवले जाणार असल्याची माहिती पदाधिकाऱ्यांनी दिली.

Whatsapp आयकॉन दाबून ही बातमी शेअर करा 

Advertising Space


मुक्त आणि खऱ्या पत्रकारितेसाठी ती कॉर्पोरेट आणि राजकीय नियंत्रणापासून मुक्त असणे आवश्यक आहे. लोक पुढे येऊन सहकार्य करतील तेव्हाच हे शक्य आहे.

आता दान करा

[responsivevoice_button voice="Hindi Female"]