नमस्कार आमच्या आजचा महाराष्ट्र टॉप टेन मराठी न्यूज चॅनेल मधे आपल स्वागत आहे...येथे तुम्हाला ताज्या घडामोडी व बातम्या मिळतील... बातम्या व जाहिरातींसाठी संपर्क - +91 9029198881 करा. आमचे YouTube चॅनेल, Facebook, Telegram ला सबस्क्राईब/ लाईक करा. , मराठी संस्कृतीवरील हल्ला परतवून लावू : हर्षवर्धन सपकाळ – आजचा महाराष्ट्र

मराठी संस्कृतीवरील हल्ला परतवून लावू : हर्षवर्धन सपकाळ

प्रतिनिधी ता सचिन पावशे

रायगड (अलिबाग) :- दि.२९ मराठी ही फक्त एक भाषा नाही, तर ती संस्कृती आहे, हा शिवरायांचा महाराष्ट्र आहे. त्यामुळे मराठी संस्कृतीवरील हा हल्ला आहे, तो आम्ही परतवून लावू, हिंदी भाषा रेटण्याचा सरकार प्रयत्न करीत आहे. तो आम्ही सहन करणार नाही,असे कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ अलिबाग येथे पत्रकारांशी संवाद साधताना म्हणाले. अलिबाग येथील रविकिरण हॉटेल मध्ये दोन दिवसीय युवा कार्यकर्त्या शिबीर आयोजित करण्यात आले होते या शिबीरानंतर पत्रकारांशी बोलताना काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ म्हणाले कि, ५ जुलै रोजी होणाऱ्या हिंदी भाषा सक्ती विरोधात होणाऱ्या मोर्चा सहभागी होणार कि नाही याचे यात्तर देण्यास त्यांनी टाळाटाळ केली. यावेळी जिल्हाध्यक्ष महेंद्र घरत , रायगड जिल्हा निरीक्षक श्रीरंग बरगे, ऍड श्रद्धा ठाकूर, सुनील थळे योगेश मगर आदी उपस्थित होते. संविधानातून भारत

कसा दिसतो आणि राष्ट्रीय स्वयंसंघाच्या मुशीतून भारत कसा दिसतो याची साधक बाधक चर्चा आज झाली स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणिकबाबत अजूनही सरकारने निर्णय घेतला नाही. मागच्या निवडणुका आम्ही महाविकास आघाडीतून लढलो आहे. आजही आमची भाजप विरोधात समविचारी पक्षांना घेणार आहोत निवडणुकीबाबत आमचे धोरण आम्ही आमच्या समविचारी पक्षांना सांगितले आहे. होऊ न घातलेल्या निवडणुकांबाबत जिल्हा आणि स्थानिक पातळीवर निर्णय घेण्याचा अधिकार दिला आहे. त्यांचे मत हे अंतिम असेल असेही सपकाळ ह्यांनी सांगितले. 

हिंदी भाषेच्या सक्तीचा विषय हा १६ एप्रिल रोजी शासन निर्यय झाला होता त्यानंतर काँग्रेस हे हा शासन निर्णय रद्द करावा अशी आग्रही भूमिका मांडली होती भाजपने हा जो डाव खेळाला आहे सर्वपातळीवर त्याचा निषेध व्हावा . भाजपने राष्ट्रीय स्वयंसंघाचे जे तत्वध्यान आहे हिंदी , हिंदू आणिहिंदू राज्य याची अंमलबजावणी करीत असताना मराठी भाषा चिरडून टाकण्याचा प्रयत्न आहे तो हणून टाकला पाहिजे शिवरायांचे वैभव आणि वारकऱ्यांचे योगदान नष्ट करण्याचं प्रयत्न करीत आहे संस्कृती रक्षणासाठी सर्वानी लक्ष दिले पाहिले असे ते म्हणाले युती आणि आधाडीमध्ये आमची पीछेहाट झाली आहे. त्याची किमंत आम्हला चुकवावी लागली आहे. यासाठीच थेट कार्यकर्त्यांशी चर्चा करीत असल्ह्याचे कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ ह्यांनी सांगितले

Whatsapp आयकॉन दाबून ही बातमी शेअर करा 

Advertising Space


मुक्त आणि खऱ्या पत्रकारितेसाठी ती कॉर्पोरेट आणि राजकीय नियंत्रणापासून मुक्त असणे आवश्यक आहे. लोक पुढे येऊन सहकार्य करतील तेव्हाच हे शक्य आहे.

आता दान करा

[responsivevoice_button voice="Hindi Female"]