नमस्कार आमच्या आजचा महाराष्ट्र टॉप टेन मराठी न्यूज चॅनेल मधे आपल स्वागत आहे...येथे तुम्हाला ताज्या घडामोडी व बातम्या मिळतील... बातम्या व जाहिरातींसाठी संपर्क - +91 9029198881 करा. आमचे YouTube चॅनेल, Facebook, Telegram ला सबस्क्राईब/ लाईक करा. , नशा मुक्त भारताचा संकल्प — जीवन धारा संस्थेची जनजागृती रॅली उत्साहात संपन्न – आजचा महाराष्ट्र

नशा मुक्त भारताचा संकल्प — जीवन धारा संस्थेची जनजागृती रॅली उत्साहात संपन्न

प्रतिनिधी अभिनव येवले 

मुंबई :- २६ जून रोजी जागतिक अंमली पदार्थ विरोधी दिना निमित्त ‘जीवन धारा’ या संस्थेच्या वतीने साठे नगर व चिता कॅम्प मानखुर्द येथे एक जनजागृती रॅली व माहिती सत्राचे आयोजन करण्यात आले. या उपक्रमात महिला मंडळ, स्नेहा संस्था, पोलीस विभाग, समुदाय नेते, तसेच सुमारे १०० हून अधिक मुलं-मुलींचा उत्स्फूर्त सहभाग दिसून आला.सध्या लहान मुलांपासून ते मोठ्यांपर्यंत

व्यसनाचे प्रमाण खूप वाढताना दिसत आहे. सध्या मुले ही विविध प्रकारच्या नशेच्या आहारी जाताना आपल्याला दिसत आहे. याच नशेपासून दूर राहण्यासाठी जीवन धारा संस्था मागील अनेक वर्षा पासून काम करत आहे. जीवन धारा संस्थेचे नशा मुक्ती केंद्र सुद्धा आहे. मुलांना व लोकांना नशे पासून दूर राहावे यासाठी नशा मुक्ती जनजागृती या रॅलीद्वारे नागरिकांना नशेच्या व्यसनापासून दूर राहण्याचे आवाहन करण्यात आले. मुलांनी हातात फलक घेऊन रस्त्यावरून घोषणांनी जागर केला — “नशा मुक्त भारत, आपला संकल्प!” अशा संदेशांद्वारे त्यांनी समाजाला एक सकारात्मक संदेश दिला.यावेळी आयोजकांनी व्यसनमुक्तीचे दुष्परिणाम, युवा पिढीवर होणारे परिणाम व कुटुंबांवरील सामाजिक-आर्थिक भार यावर सखोल चर्चा केली. पोलीस अधिकारी आणि इतर उपस्थितांनीही मार्गदर्शन करत व्यसनमुक्त समाजासाठी एकत्रितपणे काम करण्याची गरज अधोरेखित केली.’जीवन धारा’ ही संस्था गेल्या अनेक वर्षांपासून आरोग्य, शिक्षण आणि व्यसनमुक्तीसारख्या सामाजिक विषयांवर काम करत आहे. हा उपक्रमही त्याच दिशेने एक महत्त्वाचे पाऊल ठरला.

Whatsapp आयकॉन दाबून ही बातमी शेअर करा 

Advertising Space


मुक्त आणि खऱ्या पत्रकारितेसाठी ती कॉर्पोरेट आणि राजकीय नियंत्रणापासून मुक्त असणे आवश्यक आहे. लोक पुढे येऊन सहकार्य करतील तेव्हाच हे शक्य आहे.

आता दान करा

[responsivevoice_button voice="Hindi Female"]