शिक्षण हक्काची किमया न्यारी, शिक्षणगंगा आता घरोघरी
प्रतिनिधी
वसई (विरार ) :- रायगड मी प्रतिष्ठान आज गेली ६ वर्ष शैक्षणिक उपक्रम”राबवित आहे. या उपक्रमाच्या माध्यमातून समाजातील अनेक विद्यार्थी शिक्षण घेत आहेत.आई-वडिलांना या उपक्रमाच्या माध्यमातून नक्कीच दिलासा मिळत आहे. समाजातील कोणताही विद्यार्थी शिक्षणापासून वंचित राहू नये; त्यांचे शैक्षणिक वर्ष फुकट जाऊ नये; म्हणून गेली क्रित्येक वर्ष प्रतिष्ठान विद्यार्थ्यांचे हित प्राणपणाने जपत आहे. या उपक्रमाच्या माध्यमातून सहकार्य करावे 
अशी मागणी प्रतिष्ठानकडे करण्यात आली होती, त्यानुसार छोटासा सहकार्य वसई विरार विभाग कमिटीच्या माध्यमातून करण्यात आले. वसई – विरार विभागातील कु. नित्य निलेश इटले कु. उत्कर्ष निलेश इटले या विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य देण्यात आले, यावेळी *श्री.विकास बिरवाडकर (वसई -विरार विभाग प्रमुख संघटक), श्री.निलेशजी शिंदे साहेब (तळा तालुका सल्लागार ), श्री.राकेश बाटे साहेब श्री. रवींद्र जावळे साहेब,श्री. संतोष महाडिक साहेब( नालासोपारा मधील प्रतिष्ठानचे हितचिंतक) उपस्थित होते.
|
Whatsapp आयकॉन दाबून ही बातमी शेअर करा |
Advertising Space













