नमस्कार आमच्या आजचा महाराष्ट्र टॉप टेन मराठी न्यूज चॅनेल मधे आपल स्वागत आहे...येथे तुम्हाला ताज्या घडामोडी व बातम्या मिळतील... बातम्या व जाहिरातींसाठी संपर्क - +91 9029198881 करा. आमचे YouTube चॅनेल, Facebook, Telegram ला सबस्क्राईब/ लाईक करा. , आंतर राष्ट्रीय बॉक्सर कॅप्टन शिवाजीराव भोसले यांच्या स्मरणार्थ २२ जुन रोजी जिल्हा स्तरीय बॉक्सिंग स्पर्धा -प्रमोदराव भोसले – आजचा महाराष्ट्र

आंतर राष्ट्रीय बॉक्सर कॅप्टन शिवाजीराव भोसले यांच्या स्मरणार्थ २२ जुन रोजी जिल्हा स्तरीय बॉक्सिंग स्पर्धा -प्रमोदराव भोसले

प्रतिनिधी

पुणे : आंतर राष्ट्रीय बॉक्सर कॅप्टन शिवाजीराव बंडाजीराव भोसले यांच्या स्मरणार्थ जिल्हा स्तरीय बॉक्सिंग स्पर्धा दिनांक २२ जुन रोजी कोकण मराठा सभागृह दिघी पुणे येथे आयोजित करण्यात आली असून या वेळी राष्ट्रीय बॉक्सर कॅप्टन प्रमोदराव शिवाजीराव भोसले यांची शो फाइट आयोजित करण्यात आली असून मराठा क्रांती स्वराज्य संघटना राष्ट्रीय संस्थापक अध्यक्ष सदानंदराव भोसले या स्तुत्य उपक्रमात उपस्थित राहणार आहेत.या वेळी बोलताना सदानंदराव भोसले म्हणाले कॅप्टन प्रमोदराव भोसले व त्यांचे

पिताश्री आंतर राष्ट्रीय बॉक्सर कॅप्टन शिवाजीराव बंडाजीराव भोसले आंतर राष्ट्रीय बॉक्सर कॉमनवेल्थ गेम्स ब्राँझ मेडिलिस्ट हे दोन्ही पिता पुत्र मु बिजघर तालुका खेड जिल्हा रत्नागिरी जिल्हा मधील एकमेव पितापुत्राने आंतर राष्ट्रीय बॉक्सिंग स्पर्धेत भारताचे प्रतिनिधित्व केले आहे. दोनही बॉक्सिंग क्षेत्रातील कोहिनूर हिरे अद्याप शासनाच्या या क्षेत्रातील कोणताही मानाचा सन्मान न झाल्याने या दैदित्यमान कारकीर्द काहीशी दुर्लक्षीत झाली आहे. या बाबत आपण लवकरच राज्याचे मुख्यमंत्री ना.देवेंद्रजी फडणवीस तसेच विधान परिषद गटनेते सहकार महर्षी आमदार प्रवीणजी दरेकर यांची भेट घेऊन योग्य न्याय मिळवून देण्यासाठी भेट घेणार असल्याचे प्रतिपादन मराठा क्रांती स्वराज्य संघटना राष्ट्रीय संस्थापक अध्यक्ष सदानंदराव भोसले यांनी सांगितले.

Whatsapp आयकॉन दाबून ही बातमी शेअर करा 

Advertising Space


मुक्त आणि खऱ्या पत्रकारितेसाठी ती कॉर्पोरेट आणि राजकीय नियंत्रणापासून मुक्त असणे आवश्यक आहे. लोक पुढे येऊन सहकार्य करतील तेव्हाच हे शक्य आहे.

आता दान करा

[responsivevoice_button voice="Hindi Female"]