अलिबागमधील १३० वर्षांची जिल्हा परिषद शाळा हायकलने डिजिटल पायाभूत सुविधांनी सुसज्ज केली
प्रतिनिधी ता सचिन पावशे
रायगड (अलिबाग ) : २१ जून २०२५ जागतिक लाइफ सायन्सेस कंपन्यांसाठी एक विश्वासार्ह दीर्घकालीन भागीदार असलेल्या हायकलने ग्रामीण भागातील शिक्षण आणि शाश्वत विकासासाठी आपली वचनबद्धता अधिक दृढ केली आहे. अलिबागमधील झिराड येथील जिल्हा परिषद मराठी शाळेत राबविण्यात आलेल्या एका महत्त्वपूर्ण सामाजिक उपक्रमाच्या माध्यमातून हे शक्य झाले आहे. उत्कर्ष ग्लोबल फाउंडेशनच्या भागीदारीतून राबविण्यात आलेला हा उपक्रम हायकलच्या ‘सृजन’ या व्यापक कॉर्पोरेट सामाजिक जबाबदारी (सीएसआर) कार्यक्रमाचा एक भाग आहे. कंपनीच्या प्रकल्प परिसरातील लोकांच्या जीवनात सकारात्मक बदल घडविणे, हा ‘सृजन’चा उद्देश आहे.या उपक्रमांतर्गत हायकलने शाळेचे वातावरण पूर्णपणे बदलून टाकले. मोडकळीस आलेल्या फर्निचरऐवजी ७० नवीन लाकडी बाके देण्यात आली. डिजिटल आणि संवादात्मक शिक्षणासाठी ४३ इंचांचे ८ एलईडी स्मार्ट टीव्ही
बसविण्यात आले. विद्यार्थ्यांच्या कौशल्यविकासासाठी एक प्रोजेक्टर आणि स्क्रीन देण्यात आली, तर शैक्षणिक व प्रशासकीय कामकाज अधिक सुलभ करण्यासाठी मल्टीफंक्शन प्रिंटरची सुविधा पुरविण्यात आली. याशिवाय, शाळेत छत असलेला स्वतंत्र हँडवॉश झोन तयार करण्यात आला आहे, जेणेकरून कोणत्याही वातावरणात मुलांना स्वच्छता आणि आरोग्य यांची नीट काळजी घेता येईल.विद्यार्थ्यांसाठी अधिक सुरक्षित, उत्साहवर्धक आणि शिकण्यासाठी पोषक वातावरण निर्माण करणे, हा या सुविधांचा उद्देश आहे. यामुळे नियमित उपस्थिती वाढेल आणि शैक्षणिक गुणवत्ता उंचावण्यास मदत होईल, अशी अपेक्षा आहे.हायकलमध्ये आम्ही नेहमीच असा विश्वास ठेवतो की एखाद्या व्यवसायाचे यश केवळ आर्थिक आकड्यांपुरते मर्यादित नसते. खऱ्या अर्थाने मूल्यनिर्मिती तेव्हाच होते, जेव्हा विकास सामायिक केला जातो – जेव्हा आपले सभोवतालचे समुदाय आपल्या बरोबर प्रगती करतात. हेच तत्वज्ञान आम्हाला अनेक वर्षांपासून मार्गदर्शक ठरले आहे आणि आमच्या CSR धोरणाच्या केंद्रस्थानी आहे.ग्रामीण भारतातील ही शाळा – इतर अनेक शाळांप्रमाणेच – मोठ्या क्षमतेसह, हुशार मुलं आणि समर्पित शिक्षक असूनसुद्धा पायाभूत सुविधांच्या अभावामुळे मर्यादित राहिली होती. आज आपण त्या क्षमतेला मूर्त स्वरूप देण्यासाठी एक छोटं पण महत्त्वाचं पाऊल उचललं आहे. हीच आमची समावेशक विकासाची आणि अधिक न्याय्य भविष्य घडवण्याची दीर्घकालीन बांधिलकी दर्शवते. असे हायकल लिमिटेडचे कार्यकारी अध्यक्ष श्री. जय हिरेमठ म्हणाले.हायकल लिमिटेडचे उपाध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक श्री. समीर हिरेमठ म्हणाले की हायकलमध्ये आम्ही शिक्षणाला प्रगतीचा पाया मानतो. आमच्या नेतृत्वाने घेतलेल्या भक्कम पायावर उभारणी करत, आम्ही आमच्या कार्यक्षेत्रातील समुदायांमध्ये दीर्घकालीन प्रभाव निर्माण करण्यासाठी कटिबद्ध आहोत.झिराडमधील आमचे प्रयत्न ही एक दूरदृष्टीची पावले आहेत, जी शैक्षणिक दूरी भरून काढण्यासाठी सुरक्षित, सर्वसमावेशक आणि डिजिटल शिक्षण प्रणाली उपलब्ध करून देतात. अशा उपक्रमांमुळे पुढील पिढी सक्षम होईल, मोठ्या स्वप्नांचा पाठपुरावा करेल आणि सर्वांसाठी एक अधिक सक्षम आणि समृद्ध भविष्य घडवेल, असा आमचा विश्वास आहे या उपक्रमातून हायकलची शाश्वत विकास आणि सामाजाभिमुख कामकाजाच्या सातत्यपूर्ण दृष्टिकोनाची प्रचिती येते. ‘सृजन’ या कार्यक्रमाच्या माध्यमातून हायकल शिक्षण, कौशल्यविकास, रोजगारयोग्यता, आरोग्य, स्वच्छता, पायाभूत सुविधा, पर्यावरण संवर्धन आणि राष्ट्रीय वारसा, कला व संस्कृतीच्या जतनासारख्या विविध क्षेत्रांमध्ये स्वयंसेवी संस्थांशी सक्रिय भागीदारी करत आहे. या कार्यक्रमाला हायकल लिमिटेडचे कार्यकारी अध्यक्ष श्री.जय हिरेमठ, उपजिल्हाधिकारी सामान्य प्रशासन रवींद्र शेळके,शिवसेना पक्ष प्रतोद मानसी दळवी,हायकल लिमिटेडचे उपाध्यक्ष समीर हिरेमठ,ग्रामपंचायत झिराड सरपंच दर्शना भोईर, सुगंधा हिरेमठ, दिलीप भोईर माजी समाज कल्याण सभापती रा.जि.प.इत्यादी मान्यवर उपस्थित होते
|
Whatsapp आयकॉन दाबून ही बातमी शेअर करा |
Advertising Space













