कोटा राज्यस्थान येथे होणाऱ्या टी २० क्रिकेट स्पर्धेत शिवाजी पाटील यांच्या व्यवस्थापनाखाली महाराष्ट्र दिव्यांग क्रिकेट संघ जाणार’

रायगड (रोहा) :- १ व २ मार्च २०२३ रोजी कोटा राजस्थान येथे दिव्यांग महाराष्ट्र,राज्यस्थान व् उत्तर प्रदेश यांच्यात होणाऱ्या दिव्यांग टी २० स्पर्धेसाठी ऑल स्पोर्ट्स असोसिएशन फॉर डिसेबल्ड अँड रेहाबिलिटिएशन, महाराष्ट्र व सहकार्य (अपंग) दिव्यांग कल्याणकारी संस्था रायगड यांच्या सहयोगातून महाराष्ट्र दिव्यांग क्रिकेट संघ जात असून या संघात रायगड जिल्ह्यातील रमेश संकपाल कर्जत, अभिजित मुंढे,खालापूर.विवेक् कदम रायगड सुनील पाटील पनवेल,नवनाथ् घोडके खालापूर, कमलाकर कोळी पेण नंदुरबार
जिल्ह्यातील विजय वळवी,राजू वळवी कालिदास वसावे मुबंईतील रुपेश पवार,उस्मानाबाद जिल्ह्यातील भास्कर राठोड, लातूर जिल्ह्यातील हरनामसिंग टाक या खेळाडूची व कर्णधार कल्पेश तवले व प्रशिक्षक शशांक हिरवे संघव्यवस्थापक म्हणून ऑल स्पोर्ट्स असोसिएशन फॉर डिसेबल्ड अँड रेहाबिलिटिएशन, महाराष्ट्र अध्यक्ष व सहकार्य (अपंग) दिव्यांग कल्याणकारी संस्था चे सचिव शिवाजी पाटील यांची निवड करण्यात आली आहे. अध्यक्ष शिवाजी पाटील व ऑल स्पोर्ट्स असोसिएशन फॉर डिसेबल्ड अँड रेहाबिलिटिएशन, महाराष्ट्र संचालक यांच्या प्रयत्नाने महाराष्ट्र दिव्यांग क्रिकेट संघ रवाना होणार आहे
|
Whatsapp आयकॉन दाबून ही बातमी शेअर करा |
Advertising Space













