कापूस दरवाढीसाठी युवक काँग्रेसचे अनोखे आंदोलन
प्रतिनिधि श्रीकृष्ण शेळके
जालना (भोकरदन) :- राज्यात कापसाचे दर कमी होत असताना शेतकऱ्यांमध्ये प्रचंड प्रमाणात असंतोष पसरलेला आहे.सरकार विरोधात शेतकऱ्यांचा रोष वाढत चाललेला असून कापसाचे भाव वधारण्याचे कुठलेही संकेत सरकारकडून दिले जात नाही. याच गोष्टीचा निषेध म्हणून युवक काँग्रेसच्या मार्फत केंद्र सरकार विरोधात ऑनलाइन आंदोलन छेडले गेले आहे.कापसाचे भाव शेतकऱ्यांचा माल निघाल्यानंतर कमी होण्यामागे वेगवेगळे कारण असून त्यापैकी एक म्हणजे शेअर मार्केटमध्ये असलेले कापसा सहित( सात प्रकारच्या ) शेत मला वरचे वायदे बाजार बंद होणे.महागाई नियंत्रणात राहण्यासाठी केंद्र सरकारने सेबीला पुढील आदेशापर्यंत या सात कृषीमालावरचे वायदे बंद ठेवायला सांगितले आहेत.याचा थेट परिणाम स्थानिक कापूस भावावर झाला असून स्थानिक पातळीवर कापसाचे भाव पडलेले शेतकऱ्यांना बघायला मिळत आहेत.सेबी ने गत आठवड्यात वायदे बाजारासंबंधात सकारात्मक निर्णय घेण्यासाठी एक बैठक घेतली परंतु अमलबजावणी होईपर्यंत युवक काँग्रेस स्वस्थ बसणार नाही तसेच वाढलेली महागाई हे केंद्र सरकारचे पाप असुन सरकारने शेतकऱ्यांच्या मेहनतीवर त्याची मात्रा शोधू नये असे युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष राहुल देशमुख यांनी सांगितले.तर शेतकऱ्यांतर्फे वेळोवेळी तहसीलदार व जिल्हाधिकारी कार्यालयात शेतमालाच्या भावा संदर्भात निवेदन दिले गेले पण त्याचा काहीच परिणाम होताना दिसत नाही म्हणून थेट देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या फेसबुक वरील प्रोफाइल फोटो वर जाऊन कापसाचे वायदे बाजार सुरू करा अशा आशयाच्या कमेंट युवक काँग्रेस कार्यकर्त्यांनी तर्फे करायला सुरुवात झाली आहे तसेच शेतकऱ्यांनीही यात सहभाग घ्यावा यासाठी युवक काँग्रेसने आवाहन केले आहे. आठवडाभरात वायदा बाजारासंबंधी निर्णयाची अंमलबजावणी न झाल्यास रस्त्यावर उतरून आक्रमक आंदोलन करण्याचा इशारा युवक कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्ष राहुल देशमुख यांनी दिली
|
Whatsapp आयकॉन दाबून ही बातमी शेअर करा |
Advertising Space













