भारतीय कामगार युनियन च्या पनवेल तालुका अध्यक्ष पदी सौ अक्षरा संदेश भोईर यांची निवड करण्यात आली.निमित्ताने त्यांना पुढील कार्यासाठी खूप खूप शुभेच्छा..
प्रतिनिधी-जितीन शेट्टी
रायगड (पनवेल):- आज काल पनवेल रायगड मध्ये कामगारांवर वाढते अन्याय अत्याचार व सामान्य गोरगरीब कष्टकरी कामगारांना कायदेशीर न्याय मिळत नाही कंपनी/मालक ठेकेदार कामगारांना किरकोळ पगार देऊन जास्तीचे काम करून घेतात. कामगारांची पिळवणूक करतात त्यांचा हक्क लाटतात. या सर्व गोष्टी आम्ही 
लक्षात घेत पनवेल मध्ये कामगारांना योग्यरीत्या कायदेशीर न्याय मिळावा म्हणून, “भारतीय कामगार युनियन” संघटनेच्या अध्यक्षा मा. वृषाली उल्हास म्हात्रे, यांच्या आदेशाने सौ.अक्षरा संदेश भोईर यांची दि.२३ ऑक्टोंबर २०२२ रोजी पनवेल तालुका अध्यक्ष पदी निवड करण्यात आली तसेच, त्यांना नियुक्ती पत्र देऊन संघटनेच्या पुढील कार्य व वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.संघटनेचे मा.वृषाली उल्हास म्हात्रे | अध्यक्षा ] मा. उर्मिला म्हात्रे | खजिनदार ] श्री.कृष्णा गंगावणे [सह-सचिव ] कु.योगिता म्हात्रे, सुनील पवार, संदीप जाधव, सुमित गंगावणे, श्री.अशोक निसर्गध,श्री अशोक गणगे श्री मिलिंद गाडेकर अजय राजपूत , श्री.संदेश भोईर तसेच इतर पदाधिकारी उपस्थित होते
|
Whatsapp आयकॉन दाबून ही बातमी शेअर करा |
Advertising Space













