नमस्कार आमच्या आजचा महाराष्ट्र टॉप टेन मराठी न्यूज चॅनेल मधे आपल स्वागत आहे...येथे तुम्हाला ताज्या घडामोडी व बातम्या मिळतील... बातम्या व जाहिरातींसाठी संपर्क - +91 9029198881 करा. आमचे YouTube चॅनेल, Facebook, Telegram ला सबस्क्राईब/ लाईक करा. , शिक्षण क्षेत्रातील अवलिया श्री. संजय यादव गुरुजींच्या निवृत्तीच्या निमित्ताने रेखाटली त्यांच्या शैक्षणिक व सामाजिक कार्याची गौरवगाथा – आजचा महाराष्ट्र

शिक्षण क्षेत्रातील अवलिया श्री. संजय यादव गुरुजींच्या निवृत्तीच्या निमित्ताने रेखाटली त्यांच्या शैक्षणिक व सामाजिक कार्याची गौरवगाथा

पत्रकार राजेंद्र दळवी

रत्नागिरी (खेड) –प्राथमिक शाळेतील मुलांना घडवणारे आदर्श माळी श्री. संजय यादव गुरुजी यांच्या बद्दल खास चार शब्द नेहमी ज्ञानाची तहान असते तो शिक्षक नेहमी विद्यार्थ्यांची प्रगती पाहतो तो शिक्षक नेहमी ज्ञान अंजनाने प्रगल्भ करतो तो शिक्षक नेहमीच घडतो. आणि घडवतो तो शिक्षक आजवरच्या प्रवासात विद्यादानाचे कार्य करत असताना असंख्य विद्यार्थ्यांना घडवताना त्यांची बौद्धिक क्षमता उंचावण्यासाठी विशेष योगदान देणाऱ्या, श्री संजय यादव गुरुजींनी सामाजिक कार्यातही मौलिक कामगिरी केली आहे. शिक्षण क्षेत्राबरोबरच सामाजिक क्षेत्रातही आपल्या कार्यकर्तृत्वाचा ठसा उमटवला आहे. गुणवत्ता पूर्ण शिक्षणाला पायाभूत सुविधांबरोबरच आधुनिकतेची जोड देत शिक्षणाचा दर्जा उंचावण्यासाठी, विद्यार्थ्यांना यशो शिखरावर नेण्यासाठी, अविरतपणे झटणारे तिसंगी केंद्रातील बिजघर कोंडवाडी शाळेतील मुख्याध्यापक श्री. संजय राव यादव गुरुजी ३१ऑगस्ट रोजी सेवानिवृत्त होत आहेत.आंबवली गावचे सुपुत्र संजय काशीराम यादव गुरुजी त्यांच्या नोकरीची सुरुवात जि. प. शाळा भोपण नंबर १ तालुका दापोली येथे १ ऑगस्ट १९८७ रोजीझाली त्याकाळी शिक्षणाविषयी समाजामध्ये तेवढीशी जागरूकता नव्हती. गरिबी अंधश्रद्धा अज्ञान यामुळे शिक्षणाकडे पाहण्याचा समाजाचा दृष्टिकोन तेवढासा चांगला नव्हता. त्यामुळे मुलांना शाळेत आणणे ही मोठी कसोटी होती. यादव गुरुजींनी मुलांना शाळेत आणून मोठी जबाबदारी पार पाडली. अशाप्रकारे तेथील शैक्षणिक वातावरणाशी जुळवून घेत तालुक्यात तीन वर्षे सेवा पूर्ण करून आजोबांच्या आजारपणामुळे त्यांना विनंती बदली करून खेडमध्ये यावे लागले.

शिक्षण हे वाघिणीचे दूध आहे हे विध्यार्थ्यांना मिळाले तरच ज्ञानाचा तिसरा डोळा उघडेल हे मत ठामपणे मनाशी बाळगून खेडमधील दोन शाळांमध्ये बदलीचे आदेश असताना देखील स्वतःची सोय न पाहता दुर्गम अशा भागात चाटव शाळेत गुरुजी रुजू झाले.अनेक आव्हानांना सामोरे जात आपल्या अंगी असलेल्या नेतृत्वगुणांनी समाजाप्रति शैक्षणिक कार्याला झोकून देत, अनेक आव्हानांना सामोरे जात, समाजातील सर्व घटकांना एकत्र करून चाटव शाळेच्या विकासाचा पाया रचला बघता बघता ६० हजारांचा शैक्षणिक उठाव करून शाळेचा चेहरा मोहरा बदलून टाकला ज्या शाळेत कोणीही जायला तयार नव्हते ती चाटव शाळा नावारुपाला आणण्यात यादव गुरुजींचा सिंहाचा वाटा होता. गुरुजींनी शाळेचे वर्ग वाढवत हळूहळू ही शाळा सातवी पर्यंत केली. विद्यार्थ्यांचा शैक्षणिक दर्जा व शिस्त पाहून ग्रामस्थांना देखील शाळेविषयी आस्था वाटू लागली. ग्रामस्थांनी शाळेला मोफत जागा देऊन एक प्रकारे शाळेच्या विकासाला हातभार लावला. शाळेतील अनेक विद्यार्थ्यांनी शिक्षण क्षेत्रात उत्तुंग भरारी घेतली. चाटव शाळेमध्ये दहा वर्ष सेवा करून गुरुजी सणघर शाळेमध्ये रुजू झाले. गुरुजींनी हळूहळू सणघर शाळेचेही रुपडे पालटले. त्याच वेळी शेजारील हूंबरी शाळेमध्ये आव्हानात्मक परिस्थिती निर्माण झाली होती. शिक्षक व पालक यांच्यामध्ये वाद झाल्याने १ ली ते ७ वी पर्यंतच्या या शाळेमध्ये फक्त तीनच विद्यार्थी शिल्लक राहिले होते . ही शाळा बंद होणार की काय, असा प्रश्न निर्माण झाला. या शाळेला पुनर्जीवित करण्यासाठी हूंबरी ग्रामस्थांनी संजय यादव गुरुजींना हुंबरी शाळेत येण्याची विनंती केली. हे कठीण आव्हान स्वीकारत गुरुजी हुंबरी शाळेमध्ये आले. गावातील शिक्षणप्रिय ग्रामस्थांच्या मदतीने शाळेतून इतर शाळेत गेलेल्या विद्यार्थ्यांना परत शाळेत आणले. गुरुजींनी सहकारी व ग्रामस्थांच्या मदतीने अल्पावधीतच शाळा नावारूपाला आणली. शाळेचा शैक्षणिक दर्जा वाढवला त्यामुळेच या शाळेचा विद्यार्थी आंबवली हायस्कूल येथे दहावीच्या बोर्डात प्रथम आला.

शालेय कामकाज पाहताना तळागाळातील कातकरी समाजाच्या मुलांना शाळेची गोडी लावली. एकही विद्यार्थी शाळाबाह्य राहणार नाही यासाठी विद्यार्थ्यांना स्वखर्चाने शालेय गणवेश शैक्षणिक साहित्य दिले. त्यावेळी मध्यान भोजन योजना शाळेमध्ये नव्हती आदिवासी विद्यार्थी शाळेमध्ये टिकावेत नव्हे तर शैक्षणिक प्रवाहात यावेत यासाठी स्वखर्चाने त्यांच्या दुपारच्या जेवणाची सोय केली त्यामुळे आदिवासी विद्यार्थी शाळेत टिकले व शैक्षणिक प्रवाहात सामील झाले या मुलांच्या अंगी असलेले सुप्त गुण हेरून या मुलांना विविध वैयक्तिक खेळ शिकवले यातील काही विद्यार्थी जिल्हास्तरावर प्रथम व द्वितीय येऊन त्यांना क्रीडा शिष्यवृत्ती मिळाली या मुलांपासून प्रेरणा घेऊन अनेक आदिवासी मुले क्रीडा क्षेत्रामध्ये जिल्हास्तरावर चमकली

शैक्षणिक व सामाजिक क्षेत्रात काम करत असताना संजय यादव गुरुजी यांनी शिक्षक संघटनेमध्ये सक्रिय सहभाग घेतला त्यावेळी खेड तालुक्यामध्ये संजय यादव, सुधाकर शिर्के व संतोष यादव यांनी महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समिती या संघटनेमध्ये प्रवेश करून आंबवली विभागामध्ये शिक्षक समितीचा झंझावात निर्माण केला शिक्षक समितीची पाळेमुळे आंबवली विभागांमध्ये घट्ट रुजवली गोविंद यादव, दिलीप यादव, शैलेश पराडकर, आनंद वळवी, अनिल यादव, नवनीत घडशी, असे नवीन कार्यकर्ते तयार केले बघता बघता आंबवली विभाग हा शिक्षक समितीचा बालेकिल्ला झाला संघटनेचे कार्य करत असताना सुनील सावंत गुरुजी, अजित भोसले गुरुजी, व विद्यमान अध्यक्ष शरद भोसले गुरुजी यांचे वेळोवेळी सहकार्य लाभले

तिसंगी केंद्रामध्ये काम करत असताना अजित भोसले यांना महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समिती तालुका शाखा खेडचे अध्यक्ष बनवण्यासाठी गुरुजींनी अहोरात्र मेहनत घेतली. आपल्या नेतृत्वगुणाच्या कौशल्यावर अजित भोसले यांच्यासारख्या तरुण कार्यकर्त्यावर तालुकाध्यक्षपदाची जबाबदारी देण्यात त्यांचा मोलाचा वाटा होताआज आंबवली विभाग हा शिक्षक समितीमय आहे. याचे सारे श्रेय संजय यादव गुरुजी यांना जाते. शिक्षक समितीच्या जिल्हा कार्यकारणी मध्ये दोन वेळा त्यांची निवड झाली. महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीचे जिल्हा विभागीय उपाध्यक्ष म्हणून त्यांनी काम पाहिले. प्राथमिक शिक्षक पतपेढी रत्नागिरी मध्ये पतपेढीच्या स्थापनेपासून सत्तर वर्षे महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीचा खेड तालुक्यामध्ये संचालक निवडून येत नव्हता. मात्र सुनील सावंत यांच्या रूपाने दहा वर्षे महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीचा संचालक खेड मधून निवडून आला. तसेच प्राथमिक शिक्षक पतपेढी रत्नागिरीचे अध्यक्ष म्हणून राहण्याचा मान श्री सुनील सावंत यांना मिळाला. त्यांच्या या विजयामध्ये गुरुजींचा सिंहाचा वाटा होता. गेले अनेक वर्षे गुरुजींनी जे स्वप्न पाहिले होते ते स्वप्न सत्यात उतरले होते. गेली अनेक वर्षे न्यू इंग्लिश स्कूल आंबवलीचे संचालक असलेले गुरुजी हे या संस्थेचे विद्यमान सचिव आहेत न्यू इंग्लिश स्कूल आंबवलीच्या जडणघडणीत त्यांचा सिंहाचा वाटा आहे. झोलाई देवी ग्राम कमिटी आंबवली देवस्थानचे सचिव म्हणून ते काम पाहतात त्यांच्या या प्रदीर्घ यशस्वी वाटचालीमध्ये त्यांच्या सुविध्य पत्नी सौ. स्नेहल यांचा सिंहाचा वाटा आहे अशा विध्यार्थी प्रिय आदर्श शिक्षकाच्या सेवानिवृत्ती प्रित्यर्थ त्यांना लक्ष लक्ष शुभेच्छा प्रेमाचे शब्द स्नेहाचा स्पर्शआपुलकीची नजर कौतुकाची थाप सदैव मदतीचा हात असे आहेत आमचेसंजय यादव गुरुजी खास

Whatsapp आयकॉन दाबून ही बातमी शेअर करा 

Advertising Space


मुक्त आणि खऱ्या पत्रकारितेसाठी ती कॉर्पोरेट आणि राजकीय नियंत्रणापासून मुक्त असणे आवश्यक आहे. लोक पुढे येऊन सहकार्य करतील तेव्हाच हे शक्य आहे.

आता दान करा

[responsivevoice_button voice="Hindi Female"]